कोण उपटणार याचे मुळ?
वरिष्ठ अधिकारी कारवाईचे धाडस दाखविणार का??
—————————————
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-प्रतिवर्षाप्रमाणे महादेव बारसीनिमित्ताने हंडरगुळी येथे दि.३० रोजी कावड याञा आयोजित केली होती
आणि पंचक्रोषीतील बच्चे कंपनी पासुन ३० ते ४० हजार महिला-पुरुष मंडळी कावडीसह महादेवाचे दर्शन आणि महाप्रसादाचा स्वाद घेण्यासाठी या याञेमध्ये आले होते.तसेच विविध प्रकारच्या खेळण्यांसह जम्पिंगझपाक,राहटपाळना आदींनी व्यवसाय थाटला होता.खेळणीच्या दुकाणात असलेल्या पुंग्या घेऊन बच्चे,बडे असे अनेकजण पाॅं,पाॅं असा पुंगीचा आवाज करत हिंडत होते.माञ यात सगळ्यात मोठा कहर केला दुचाकी चालकांनी आणि देशप्रेमींनी...!
कारण, कायदा अभी जिंन्दा है,असे म्हणत जिल्ह्याच्या विविध भागात कारवाईचे धाडस दाखविणारे अधिकारी व कर्मचारी या भागात नाहीत. म्हणुनच हंडरगुळीच्या याञे मध्ये फटाका सायलेन्सर आणि कर्णकर्कश हाॅर्न वाजवणा-या दुचाकीस्वारांच्या टोळीने याञा परिसरात धुमाकूळ घातला. यामुळे नवजात शिशू,जेष्ठ व महिला मंडळी हैराण,परेशान झाले.अशा प्रकारच्या टोळक्यांमध्ये सर्वाधिक अल्पवयीन होते.ते पण ट्रीपल व चोबल सीट...हे विशेष...!!
या गावात अशा प्रकारच्या वाहनांवर कारवाई करणारी यंञणाच अस्तित्वात नाही.
म्हणुनच सालाचे १२ महीने असा प्रकार सर्रास होताना दिसतो. माञ,संबंधितांना दिसत नाही. म्हणुनच आता याञेसारख्या धार्मिक कार्यामध्ये ही अशा प्रकारच्या टोळ्या धुमाकुळ घालताना नजरेस पडतात.
तेंव्हा सामाजिक शांतता भंग झाली तर याला जबाबदार कोण?चांगले वातारण दुषित करणा-या टोळ्यांवर आॅपरेशन आॅल आऊट सारखे कारवाईचे धाडस वरिष्ठ तरी दाखवतील का व कधी ? असा प्रश्न जनतेतून चर्चीला जातोय.


0 टिप्पण्या