चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर : रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील रहिवासी असलेले,बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांना महाराष्ट्र पोलीस मित्र शोषण असोशियन लातूर ( महाराष्ट्र राज्य ) तर्फे देण्यात येणार नेताजी सुभाष चंद्र बोस " राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार " नुकताच जाहीर करण्यात आला आहे. येत्या दिनांक - 29 मार्च 2026 रोजी रविवारला लातूर येथे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज प्रबोधनकार भीमशाहीर तथा पत्रकार बागवान कडबे यांना त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक ग्रंथालय चळवळीतील, पत्रकारितेतील भरीव कार्याची दखल घेऊन त्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. " काही माणसे जन्माने मोठी होत नाहीत,तर ती आपल्या कार्याची आणि विचारांची उंची व ध्येय गाठून मोठे होतात, त्यांचे जीवन म्हणजे केवळ श्वास घेणे नव्हे, तर समाजाच्या आत्म्याला चैतन्य देणे असते, असेच बहारदार अजो ड,अष्टपैलू, रत्ना सारखे व्यक्तिमत्व म्हणजे - भीम शाहीर प्रदीप कडबे याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले आहे.


0 टिप्पण्या