Ticker

6/recent/ticker-posts

घोडगव्हाण येथील जि.प. प्राथमिक शाळेत 'जागतिक महिला दिन ' उत्साहात साजरा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
घोडगव्हाण (ता. मोर्शी ):- येथील जि.प. प्राथमिक शाळेत दि. 8 मार्च रोजी 'जागतिक महिला दिन अत्यंत उत्साही अन् प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. गावचे सरपंच अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व श्री. विजयभाऊ टेकाडे यांच्या अध्यक्षते खाली तर प्रमुख आणि प्रख्यात वक्ते श्री .जयभारत देशमुख ,श्री विवेकानंद कन्या विद्यालयातील इयत्ता 9 वी ची विद्यार्थिनी कु . सृष्टि क्षीरसागर , तथा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .माधुरी टेकाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रारंभी ज्ञानदेवता माँ सरस्वती तसेच स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत मॉ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले

प्रास्तविकामधून श्री.चापके सर यांनी महिला दिनाचे सामाजिक महत्व अधोरेखित करत कार्यक्रमाची रुपरेषा प्रभावीपणे मांडली

याप्रसंगी प्रमुख वक्ते जयभारत देशमुख यांनी आपल्या प्रखर अभ्यासू भाषणातून प्राचीन मध्ययुगीन व आधुनिक काळातील महिलांच्या संघर्षमय आणि यशस्वी कार्यकर्तृत्वाचा ऐतिहासिक उल्लेखनीय उत्तुंग कार्य कर्तृत्वाबद्दल स्त्रीशक्तीचा गौरव केला. महिला सशक्तीकरण ' स्त्रीशिक्षणाचे महत्व ' तसेच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना मिळणाऱ्या लांभाची उत्कृष्ट माहिती प्रभावीपणे दिलीत

शालेय विद्यार्थिनी कु. सृष्टि क्षीरसागर हिने आपल्या अभ्यासू ' आत्मविश्वासाने प्रभावी ओघवत्या वाक्चातुर्याने स्त्रीशक्तीचा स्वाभिमान , विजिगीषु महिलांच्या अथांग कार्यकर्तृत्वाचा आपणही वाचन करुन अंश व्हावा ' स्त्री शिक्षणाचा अधिकार अत्यंतिक पणे स्विकारुन समाज परिवर्तन करण्याची क्षमता विकसित करावी. मुलींना शिक्षण द्यावे अशा अनेक मार्मिक विषयांवर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलीय . ह्या सारख्या प्रभावी विचारांनी तिने उपस्थितांची मने जिंकलीत

अशा देखण्या 'वैचारिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रासिका टेकाडे हिने केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका सौ. माधुरी टेकाडे यांनी केलेत. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सौ .मंगला ढोमणे , सारिका टेकाडे , कृतिका टेकाडे ' माधुरी टेकाडे ,चापके सर यांनी अथक परिश्रम घेतलेत. कार्यक्रमाचा समारोप प्रसाद वितरण चहापानाने संपन्न झाला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या