साकोलीत नेत्र व आरोग्य शिबीरात २०५ जणांची तपासणी
१०० जणांची शस्त्रक्रियेला निवड
१२५ चष्मे वाटप
चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली : -जीते जी रक्तदान और मरने के बाद नेत्रदान याप्रमाणे प्रत्येक जणांनी हे कार्य राबविले तर जखमी रूग्णांना रक्त मिळून जीवनदान आणि नेत्रहीनांना दृष्टी मिळेल असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांनी केले. ते जागतिक महिला दिनानिमित्त तसेच स्व. आत्माराम पटले व स्व. मुरलीधर गजापुरे यांच्या स्मरणार्थ आणि महात्मे नेत्र पेढी नागपूर, भंडारा जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती, शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान, श्याम बहुउद्देशीय शिक्षण संस्था साकोली, जिजामाता पतसंस्था साकोली व डॉ. हेडगेवार सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात डोळ्यांची तपासणी व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलेले होते. या शिबीरात २०५ जणांची तपासणी करण्यात आली असून १०० जणांची शस्त्रक्रियेला निवड तर १२५ जणांना चष्मे वाटप करण्यात आले. या नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबीराला अतिथी म्हणून शरद गुप्ता, नगराध्यक्ष देवश्री कापगते, माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, प्रशांत गुप्ता, किशोर गुप्ता, मालती लांजेवार, संस्था सचिव ॲड. मनिष कापगते, देवनाथ रहांगडाले, रंजना मस्के आदी उपस्थित होते. शिबिरात महात्मे नेत्र पेढी नागपूरचे डॉ. अरविंद डोंगरवार, डॉ. विश्वजीत निकम, अथर्व भोंदले, ऐश्वर्या कडवे, आस्था बन्सोड, रितू सेलोटे या चमूने नेत्र आरोग्य सेवा दिली. येथे एकुण १०० जणांची मोतिबिंदू शस्त्रक्रियासाठी नागपूरला निवड करण्यात आली. त्यासाठी पहिली ५० जणांची चमू १६ मार्चला व दुसरी ५० जणांची चमू १८ मार्चला नागपूरला रवाना होणार आहेत. या शिबिरात एकुण २०५ जणांनी नोंदणी करून आरोग्य शिबीराचा लाभ घेतला आणि १२५ जणांना चष्मे वाटप करण्यात आले. शिबिरात संचालन ॲड. मनिष कापगते यांनी केले. याप्रसंगी स्व. शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. गजानन डोंगरवार, शकुंतला कापगते, विवेक कापगते, मोरेश्वर गहाणे, प्रतिष्ठानचे प्रसिद्धी प्रमुख आशिष चेडगे, राजू कापगते, युवराज गहाणे, अंगराज समरीत, अस्मिता पुरामकर, मधूकर नगरकर, भागवत लांजेवार, आशिष सैलोकर, सुमन शेंडे आदींनी स्वागत तथा आयोजनात विशेष सहकार्य केले


0 टिप्पण्या