चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:-जि.प. उच्च प्राथमिक शाळा तूडमापुरी येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेंद्र घरत, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रेमलाल सावसाकडे, प्रतिमा घोरमारे, हेमलता चौधरी, मनीषाताई बडोले, राजेश कोटांगले, मुख्याध्यापक डी. डी. वलथरे, आर. डी. पारधी, वाय. टी. हुकरे, डी.आर. कापगते, पी. एम. चौधरी, सावसाकडेताई, आनंदा नेवारे उपस्थित होते. इयत्ता सातवीच्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती अमूल्य असे भावनिक विचार प्रगट केले. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचे डोळे पानावलेले अवस्थेत होते. याप्रसंगी शिक्षक सुद्धा भावनिक झाले. पुढील वाटचालीसाठी शिक्षकांनी शुभेच्छा दिल्यात. शिक्षकांना आपल्या मनोगतामधून आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी शिक्षकांनी सांगितलेल्या मार्गदर्शनामध्ये आपले काम करावे व यशाचा मार्गक्रम करत राहावा असे विचार प्रगट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. डी. वलथरे,
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सरोज टीचर, आभार वाय. टी. हुकरे यांनी मानले.


0 टिप्पण्या