Ticker

6/recent/ticker-posts

१०२ रुग्णवाहिका वाहन चालकांचे आमरण उपोषण


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली  :-जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालयातील १०२  रुग्णवाहिका चालकांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कार्यरत शासकीय १०२ रुग्णवाहिकांच्या १४ वाहन चालकांनी  यापूर्वी उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे आपल्या अन्यायाविरोधात ३० एप्रिल २०१९ रिट याचिका दाखल केलेली होती. त्या अनुषंगाने न्यायालयाने कार्यरत वाहनचालकांना नियमित कर्मचाऱ्यांच्या किमान टप्प्यावर वेतन व फरकाची रक्कम देण्याकरिता जिल्हा परिषद भंडारा यांना दिनांक ६ / ४ / २०२२ ला आदेश पारित केले. परंतु  तेव्हापासून याचिकाकर्ते १४ वाहन चालकांना अजून पर्यंत फरकाची रक्कम व नियमित कर्माच्या किमान टप्प्यावर वेतन सुरू करण्यात आलेले नाही. याचिका  वाहन चालकांनी अनेकदा मागण्या संदर्भात राज्यस्तरावर व जिल्हा स्तरावर पत्रव्यवहार केले. परंतु सदर पत्राची कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे शेवटी वाहन चालकांनी सदर उपोषणाला बसण्याच्या निर्णय घेतला. फरकाची रक्कम १५ मार्च पर्यंत वाहन चालकांना न मिळाल्यास दिनांक १६ मार्च २०२६ पासून जिल्हा परिषद भंडारा समोर आमरण उपोषणाला बसण्याची भूमिका घेतली आहे. यात उपोषण कर्ते वाहन चालकांच्या जीविताला जीवित हानी झाल्यास  सर्वशी राज्य शासन व जिल्हा प्रशासन राहील असे दिलेल्या निवेदनात नमूद आहे. या संदर्भाची निवेदन प्रत डॉ. कादंबरी बलकवडे आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई, डॉ. सुनिता गलोईत सहसंचालक तांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई, डॉ. सरिता हजारे सहसंचालक आरोग्यसेवा, डॉ. बाळासाहेब सोनवणे सहसंचालक तंत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना देण्यात आलेली आहे. सदर निवेदन देणाऱ्यांमध्ये  महेंद्र मेश्राम, महेश लांजेवार, नितीन कावळे, गौरी गिरेपुजे, शरीफ शेख व इतर वाहन चालकांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या