Ticker

6/recent/ticker-posts

धुलिवंदनादिनी हंडरगुळीत उधळला एकतेचा रंग

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-दि.३ मार्च रोजी धुलिंवदना चा उत्सव मोठ्या आनंदाने सर्व धर्मीयांनी एकञीत येत एकमेकांवर एकतेच्या रंगाची मुक्तहताने उधळन केली.
होळी हा केवळ रंगाचा सण अथवा उत्सव नसून,तो प्रेम आपुलकी,एकतेच्या नात्याची जपणुक करणारा सण आहे.आणि वर्षानुवर्षा पासून सर्वधर्मीय बुर्जूगांनी जपलेली एकतेची परंपरा यंदाच्या रंगोत्सवातही हाय फाय,विज्ञान तंञज्ञानाच्या जमान्यातल्या पिढींनी कायम ठेवली.आणि दि.३ रोजी सकाळपासूनच गल्लो गल्ली बच्चेकंपनीसह युवक एकमेकांवर प्रेम,आपुलकी व एकतेच्या रंगाची उधळन करीत यंदाचा रंगोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या