चित्रा न्युज प्रतिनिधी
पुनावळे :-दरवर्षी प्रमाणे यंदाही येथील गायकवाड नगरातील Gk रोज अस्तर सोसायटीत हुताशनी पौर्णिमा (होलिका दहन उत्सव) सोसायटीतील रहवासी लहान मुले , महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी उत्साहात साजरा पार पाडला. सोसायटीतील पंडित कुलकर्णी काका यांनी विधिपूर्वक मंत्रोपचाराने होलिकाचे पूजन केले.
सोसायटीचे उत्सव समितीचे अध्यक्ष श्री भगवती अण्णा याच्या हस्ते हे पूजन झाले. उत्सव समितीचे बालाजी जाधव, नरेंद्र पाटील रोहित कोल्हे, मगर, शेट्टे यांनी होली प्रदीप्त केली.
यावेळी सोसायटीचे ज्येष्ठ नागरिक निवृत्तीभाऊ मोरे, अशोक वस्तानी, सतीश भालेराव, केशव काळपांडे, विनायकभाऊ हुगेवार, विलासराव संगपाल, गिरी गोसावी, इत्यादी उपस्थित होते.
होली दहन झाल्यावर पुरुष व महिलांनी होली पूजनास सुरवात केली. हा क्रम उशिरा रात्री पर्यंत सुरु होता. यावेळी सोसायटीतील पुरुष महिला व बालगोपालमधील उत्साह पाहण्या सारखा होता.


0 टिप्पण्या