Ticker

6/recent/ticker-posts

भद्रावतीत रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा!

हजारों भक्तगण झाले शोभायात्रेत सहभागी!

 पोलिसांचा चोख बंदोबस्त; 
रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची अलोट गर्दी! 

शोभायात्रेतील देखावे ठरले लक्षवेधक! 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : येथील स्थानिक विठ्ठल मंदिरापासून भव्य शोभायात्रा निघाली .
या शोभायात्रेचे आयोजन  विठ्ठल मंदिर  श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने करण्यात आले होते.

सदरहु शोभा यात्रेत सामाजिक संस्था,भजन मंडळ व व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
शोभायात्रेच्या निमित्ताने अनेक लक्षवेधक देखावे सादर करण्यात आली होती तर काही मंडळांच्या वतीने प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. विशेष म्हणजे या शोभायात्रेत सर्व धर्मियांचे लोकांनी आपला सहभाग दर्शविला होता़.
शोभायात्रा बघण्यासाठी मुख्य रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची अलोट गर्दी लोटली होती.
सकाळ पासूनच भद्रावती शहराचे वातावरण भक्तिमय झाले होते.
शोभायात्रा दरम्यान कायदा,  शांतता व  सुव्यवस्था राखण्यासाठी निरीक्षक योगेश्वर पारधी यांचे मार्गदर्शनात  भद्रावती पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शोभायात्रेच्या स्वागतासाठी रस्त्यावर ठिकणी ठिकाणी सामाजिक संघटनांच्या वतीने प्रभु श्रीरामाचंद्राच्या  प्रतिमा व सरबत थंडपेय प्रसादाचे टॉल्स लावुन श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेत सहभागी होणाऱ्यांचे स्वागत करण्यात आले होते.

या शोभा यात्रेत प्रामुख्याने संयोजक चंद्रकांतजी गुंडावार, नगराध्यक्ष प्रफुल चटकी, गोपाल ढेंगणे, झनकलाल चौधरी, सुहास गिरसाळवे,प्रकाश आईचवार, शरद राजुरकर,सुनिल पोटदुखे, सौरभ घागी,राजेश्वर मामीडवार,अनंता ताठे, भारत नागपुरे, विनोद पांढरे, नरसेवक सुनिल नामोजवार व  नंदु पढाल आदी   सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या