भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाप्रबंधक यांना निवेदन
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : येथील नुकत्याच होऊ घातलेल्या आयुध निर्माणी चांदा येथील वर्क्स कमिटीची निवडणूक दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी नियोजित आहे. सदर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंजूमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी यांनी संस्थेच्या सभासदांना व आयुध निर्मानि कर्मचारी यांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने दिनांक २६ मार्च २०२६ पासून वीस (२०) लिटर क्षमतेच्या पाणी कॅनचे वाटप सुरू केले आहे.व आजही ते वाटप करणे सुरूच आहेत
आणि कंजूमर्स को ऑपरेटिव्ह सोसायटीचे पदाधिकारी व संचालक हे वर्क्स कमिटीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणुन उभे आहे यांची उमेदवारी अर्ज रद्द करावा
या आशयाचे निवेदन कॉमरेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या नेतृत्वात महाप्रबंधक आयुध निर्मानि चांदा व निर्णय निवडणूक अधिकारी आयुध निर्मानि चांदा यांना देण्यात आले आहे
सदर कृती ही निवडणूक प्रक्रियेत मतदारांना आकर्षित करण्यासाठी व मतप्रभाव टाकण्यासाठी करण्यात येत असून, ही आचारसंहितेचा भंग करणारी तसेच कायद्याने निषिद्ध बाब आहे. अशा प्रकारचे प्रलोभन देणे हे निवडणुकीतील पारदर्शकता व निष्पक्षतेस बाधा आणणारे आहे.
करिता आपणास या पत्राद्वारे सूचित करण्यात येत आहे की यावर योग्यती कारवाई करावी असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षा तर्फे देण्यात येत आहे
मागण्या : ---
१)वरील प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी.
२) संबंधित पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
३) आचारसंहितेचा भंग झाल्यामुळे सदर वर्क कमिटी निवडणूक रद्द/स्थगित करण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.
निवेदनाच्या प्रति
केंद्रीय गृहमंत्री संसद भवन नवी दिल्ली,
केंद्रीय रक्षा मंत्री संसद भवन नवी दिल्ली, केंद्रीय निवडणूक आयोग - निवडणूक भवन नवी दिल्ली, केंद्रीय डिफेन्स सेक्रेटरी नवी दिल्ली, द सेक्रेटरी ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड आयुध भवन कलकत्ता, राज्य निवडणूक आयुक्त मुंबई, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर ( एम डि ) म्युनिशन फॅक्टरी खिडकी- पुणे, गृहमंत्री मुंबई , राज्य निवडणूक आयुक्त मुंबई , विभागीय आयुक्त नागपूर, विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा निवडणूक अधिकारी चंद्रपूर, तहसीलदार भद्रावती, ठाणेदार भद्रावती यांना देण्यात आले.


0 टिप्पण्या