चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-८ मार्च २०२६ रोजी आयुषी पॅरामेडीकल कॉलेज भंडारा मोहाडीच्या संयुक्त विदयमाने, जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला अध्यक्ष स्थानी सौ. माया सजय बारापात्रे, प्रमुख पाहुणे सौ. स्मिता कुवै (इंभरे), उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सानिया बोरीकर या विद्यार्थिनीने केले.
प्रमुख वक्ता, मा. डॉ. संजय मानकर सर यांनी महिला दिनाचे महत्व, महिला सक्षमीकरण, महिला व किशोरी यांचेमधील विविध आजार, H.P.V. (गर्भाशयाचा कॅन्सर लस) यांचे महत्व, महिलांचे कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक, आर्थिक उन्नतीमध्ये महत्वपूर्ण वाढ, महिला राष्ट्रीय कार्यक्रम व उपक्रम, लिंग समानता, स्त्रीपुरुष सहशिक्षणाचे महत्वः अंतराळ, क्रीडाक्षेत्र, आरोग्यक्षेत्र याठिकाणी महिलांनी केलेली प्रभावी कामगिरी, आईबाबांचे महत्व, लहान कुटुंबाचे महत्व, कुटुंबामधे वृद्धांची घ्यावयाची काळजी (PALLIATIVE CARE); महिला बचत गटांचा सहभाग, महिलांमधील अंधश्रद्धा निर्मुलन, तसेच सीपीआर प्रशिक्षण, प्रथमोपचार, फिजीओथेरेपी, योगा, निसर्गोपचार, आयुर्वेदातील पत्थे, अपत्ये यांचे महत्व इ. बाबत सविस्तर माहिती दिली.
उपस्थिती सर्वश्री, जयश्री सांदेवार, कल्याणी चाचेरे, पायल राऊत, सिया वाघमारे, संचिता चोपकर, श्वेता वाघमारे, शर्वरी गणवीर, मोहिनी ठवकर, तेजस्वीनी बोकडे, साक्षी हिवरकर, साक्षी मूर्खे, दिव्या कारुंदे, हेमा पराते, सुष्मिता मडावी, यांची होती. आभार प्रदर्शन कु. जयश्री सांदेवार हिने केले.


0 टिप्पण्या