Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिनी आदिवासी टायगर सेना च्या वतीने महिला प्रबोधन मेळावा संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर:-८ मार्च जागतिक महिला दिना निमित्ताने
आदिवासी टायगर सेना च्या वतीने एक दिवसीय महिला प्रबोधन मेळावा तसेच महिला सत्कार सोहळा शाशकीय विश्राम गृह चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला.
        इतिहासातील सर्व कर्तृत्वान महान महिलांच्या प्रतिमेस अभिवादन करून तथा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.महिला कश्या प्रकारे कार्य करून आपल्याला लाभलेला ऐतीहसिक वारसा पुढे जपला पाहिजे ह्या बद्दल मत मांडण्यात आले. संविधानातील विविध कायदे स्त्रियांना संरक्षण, स्वातंत्र्य,सन्मान, व न्याय,अधिकार देतात ह्या बद्दल माहिती देण्यात आली. आदिवासी महिलांन साठी आदिवासी विकास विभाग मार्फत अनेक उपक्रम राबविले जातात ह्याची माहिती देण्यात आली.महिलांना होणारे आजार व त्यावरील उपचार याबाबत जनजागृती , तसेच शिक्षणाचे महत्व महिलांना पटवून देण्यात आले .
      यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षा मनुन योगिता शेडमाके विदर्भ महासचिव, उद्घाटक म्हणून मीनल आत्राम विदर्भ कार्याध्यक्षा, मुख्य मार्गदर्शक म्हणून कविता गेडाम सामाजिक विचारवंत, सरिता सोयाम प्रकल्प कार्यालय चंद्रपूर,लताताई वाडीवे ठाणेदार , निशा प्रगती प्रभुदास उदस,समन्वयक चंद्रपूर. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ महिला पदाधिकारी वर्षा परचाके, सुमित्रा आलाम,रंजना आत्राम, दीपा कुलमेथे,पुष्पा मेश्राम,वर्षा आत्राम,रेखा कुमरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
       मेळाव्यास उपस्थित सर्व महिलांना पेन, पुष्पगुच्य तसेच पिवळा शेला देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्वांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन करण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी आदिवासीं टायगर सेना जिल्हा शाखा चंद्रपूर च्या प्रतिज्ञा किन्हाके,योजना किन्हाके,पूजा कुरसंगे,संगीता सिडाम,सोज्वळ कूमरे, रेखा सोरते,पौर्णिमा आत्राम,रिता मडावी,रजनी आलाम,निशा मडावी,राजेश्वरी कूमरे,वंदना उईके,उज्ज्वला उईके,पुष्पा सोयाम, नलिनी गेडाम, ह्यानी प्रयत्न केले .
   महिला मेळाव्याच संचालन मनीषा मडावी मॅडम विदर्भ प्रवक्त्या आदिवासी टायगर सेना,प्रस्तावीक वर्षा परचाके, तर आभार प्रदर्शन वर्षा आत्राम ह्यांनी केले. महिला मेळाव्यास भावना चिवंडे,पायल सिडाम,शीला कुलमेथे,संगीता येरकडे,ममता मडावी,भाग्यश्री कुमरे,सुश्मिता किंन्हाके,वर्षा सयाम,कुमुद आत्राम,पौर्णिमां मडकाम,मीना कुंभारे,वर्षा कुलमेथे,इशा मडावी,वर्षा कोहचाडे,वंदना चायकाटे,सोनू टेकाम,सुनीता मडावी,ज्योती पेंदोर,संजीविनी सयाम,वैशाली भालवी,अर्चना उईके , सह शेकडो आदिवासी टायगर सेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या