Ticker

6/recent/ticker-posts

योगसाधक व ज्येष्ठ नागरिकांनी सहलीतून निसर्ग,अध्यात्म व इतिहासा जवळून अनुभवला

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा:-योग हा केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक शांतता आणि सांस्कृतिक वारशाशी जोडणारा एक सुंदर प्रयत्न आहे. या उद्देशाने योग भारती बहुउद्देशीय संस्था भंडारा आणि दी भंडारा महिला नागरी सहकारी पतसंस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने अलीकडेच योग साधक व ज्येष्ठ नागरिकांसाठी नगरधन किल्ला, रामटेक गड मंदिर, घोगरा महादेव, कुँवारा भीमसेन आणि कोराडी देवी मंदिर आदी स्थळांची सहल आयोजित करण्यात आली. या सहलीत सर्व योग साधकांनी निसर्ग, अध्यात्म आणि इतिहासाचा आनंद घेत नवीन ऊर्जा अनुभवली.

सकाळी ८.०० वाजता राजीव गांधी चौक येथून बसद्वारे सर्व योग साधकांनी प्रस्थान केले. मौदा येथे रबडीवाला हॉटेलमध्ये सर्वांनी नाश्ता करून नगरधन किल्ल्याला भेट दिली. तेथे किल्ल्याचा प्राचीन इतिहास, वास्तुकला आणि महत्त्व यांची माहिती घेतली. त्यानंतर रामटेक गड मंदिराला भेट देऊन तेथील प्राचीन मंदिरे व कालिदास स्मारकाचा पौराणिक इतिहास जाणून घेतला. आसपासच्या पर्वतीय दऱ्यांचे नयनरम्य दृश्य पाहून सर्वजण मंत्रमुग्ध झाले.
यानंतर घोगरा महादेव येथे भेट देऊन मंदिराचे दर्शन घेतले. येथे दगडी पर्वतरांगांमधून वाहणाऱ्या पेंच नदीचे दृश्य भेडाघाटची आठवण करून देणारे होते. येथे सर्वांनी भोजनात झुणका-भाकरचा आस्वाद घेतला. त्यानंतर कुँवारा भीमसेन या स्थळाला भेट देऊन तेथील मंदिर, पेंच नदीचा विशाल परिसर आणि पर्वतीय सौंदर्य अनुभवले. काहींनी बोटिंगचाही आनंद घेतला.

जंगलातून प्रवास करत निसर्गाचा आनंद घेत सायंकाळी कोराडी देवी मंदिरात पोहोचून सर्वांनी माँ जगदंबेचे दर्शन घेतले व सात्त्विक महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री ९.०० वाजता बसने सर्वजण आपल्या गंतव्यस्थानी परतले.

या सहलीचा मुख्य उद्देश योगासोबत निसर्ग आणि संस्कृतीशी जवळीक साधणे हा होता. योग हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मानसिक व आध्यात्मिक विकासासाठी अशा ज्ञानवर्धक सहलींचे आयोजन योग भारती बहुउद्देशीय संस्था वेळोवेळी करत असते.

या सहलीचे संयोजक योग भारती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व प्रमुख योग शिक्षक श्री. शाम कुकडे तसेच संयोजिका दी भंडारा महिला नागरी सहकारी पतसंस्था भंडाराच्या अध्यक्षा श्रीमती दुर्गाताई डोरले मॅडम होत्या.

या सहलीत सर्वश्री शाम कुकडे, अतुल वर्मा, के. झेड. शेंडे, उद्धव डोरले, वामनराव गोंधुले, प्रा. गुरुप्रसाद पाखमोड़े, आत्माराम बेदरकर, अनिल शेंडे, हरिभाऊ थोटे, मधुकर गभने, प्रभाकर तितीरमारे, मारोती शेंडे, मधुकर बोंद्रे, प्रभू मने, कृष्णा मस्के, पुरुषोत्तम सेलोकर, शिवशंकर मस्के, गोपाल माटुरकर, शामराव सार्वे, पुरुषोत्तम साकुरे, भास्करराव रोकडे, संदीप पात्रा, तुळशीराम नवखरे, श्रीमती दुर्गाताई डोरले, श्रीमती बेदरकर, श्रीमती कमला कुकडे, श्रीमती लता मते, श्रीमती देशमुख, श्रीमती थोटे, श्रीमती मोटघरे, श्रीमती सपना तीबुडे, राजेंद्र देशमुख, विष्णुदास जगनाडे, किरण धांडे, प्रभू पराते, विनोद सपाटे, मारोती शेंडे, रामेश्वर येलणे, जगदीश कमाने, प्रभाकर तिवाडे, रत्नाकर लेदे, प्रभू मडावी, अशोक साकुरे, रमेश मोटघरे, अशोक मेश्राम, सेवक हातझाडे, अरुण खेडीकर आदी योग साधक-साधिकांचा समावेश होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या