चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:- झाडीपट्टी रंगभूमीची कित्येक वर्षापासून अखंडित सेवा सुरू आहे. या रंगभूमीच्या माध्यमातून आपले लोकं समोर यायला हवीत. नव्या पिढीने रंगभूमीकरिता सज्ज असावे. रंगभूमीच्या माध्यमातून दरवर्षी ८० ते ९० कोटीची उलाढाल होत असते. इतकेच नव्हे तर कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे देखील महत्त्वाचे आहे. हे अमूल्य कार्य जनजागर कला साहित्य बहुउद्देश्य संस्था साकोलीच्या माध्यमातून भावेश एकनाथ कुटांगले आणि त्यांची चमू करीत आहे. ही निश्चित अभिनव, अभिनंदनिय बाब आहे. प्रसिद्धी माध्यमांनीसुद्धा कलावंतांची दखल घेतली पाहिजे. त्यामुळे कलावंतांना एकप्रकारे प्रोत्साहन मिळत असते. परंतु कलावंतांनी रंगभूमीची मनापासून प्रामाणिकपणे सेवा करावी असे प्रतिपादन पद्मश्री पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कलावंत डॉ. परशुराम खुणे यांनी केले. ते साकोली तालुक्यातील वीरसी येथे विदर्भस्तरीय लोककला महोत्सव उद्घाटन समारंभात उद्घाटक पाहुणे म्हणून बोलत होते. दोन दिवसीय विदर्भस्तरीय लोककला महोत्सव वीरसी येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या प्रशस्त प्रांगणात आयोजित करण्यात आलेला होता. जनजागर कला साहित्य बहुउद्देशीय संस्था साकोलीच्या माध्यमातून सदर कला महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता. या विदर्भस्तरीय लोककला महोत्सवासाठी उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, भंडारा जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती शितलताई राऊत, सिने नाट्य अभिनेता शेखर पटले, सामाजिक चळवळीचे नेते परमानंद मेश्राम, नाट्यकलावंत चेतन वडगाये, ज्येष्ठ कलावंत भूमाला कुंभरे, सरपंच लीलाधर सोनवणे, कलावंत आशाताई गडेकर, नंदू पोगडे, जनार्दन सोनवणे, धनंजय पुस्तोडे, जयंत देशपांडे, उपसरपंच नंदलाल राऊत, पोलीस पाटील नंदलाल गहाणे, तमुस. अध्यक्ष रंजीत बागलकर, जि. प. मुख्याध्यापक कामठे, जीएस हायस्कूलचे प्राचार्य बोरकर, बापूलाल पंधरे, नारायण उके, भगवान लांजेवार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
व्यासपीठासमोरील समस्त प्रतिमाचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी स्मृतीशेष मनोज कोटांगले यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करून मानवंदना देण्यात आली. या निमित्ताने व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने हृदयी सत्कार करण्यात आला. तर याच कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाडीपट्टी क्षेत्रात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंत आशावरी तिडके, सपनाताई मोटघरे, दुधराम कावळे, विनोद मुरकुटे, तिर्थानंद बोरकर, मनोज बोपचे, कार्तिक मेश्राम, अर्चना कानेकर, भुमलाताई कुंभरे यांचा गौरव करण्यात आला. यात पत्रकार साहिल रामटेके, रवि भोंगाने यांचाही समावेश होता. या दोन दिवसीय कला महोत्सवात राज्यस्तरीय कवी संमेलन, रक्तदान शिबिर, " सजना डाव जिंकला " या नाट्यप्रयोगसह कार्यक्रमांचा समावेश होता. उद्घाटन समारंभात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतासह आपल्या गाजलेल्या नाट्य भूमिकेतील डायलॉग सादर करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन जनजागर कला साहित्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भावेश कोटांगले यांनी केले.


0 टिप्पण्या