चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा:-शालेय शिक्षणानंतर पदवी पदविका.. त्यानंतर नोकरी, मोठ मोठे पद .. मोठा व्यवसाय..समाजात रुतबा... आणि कालांतराने असा हा जीवनाचा प्रवास.आयुष्याच्या प्रवासात धावता धावता कधीतरी मागे वळून पहावसं वाटतं. जे मागे सुटून गेले त्यांना पुन्हा भेटावसं वाटतं. आयुष्याच्या विशिष्ट वळणानंतर जीवनात असाही योग येतो, ज्यांच्या खांद्यावर मित्र म्हणून हात ठेवीत खेळत बागडत होतो , तेच मित्र चक्क २३ वर्षानंतर आई- बाबा, काका-काकु , आत्या -मामा या रूपात आपल्यापुढे येतात तेव्हा काय धमाल उडते हा तो योग होता.जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय/ज्युनिअर कॉलेज मुरमाडी/तुप येथिल वर्ष२००१ ते २००३ या काळात वर्ग अकरावी व बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याच शाळेला भेट देण्याचे ठरविले आणि ७ मार्च तो योग घडून आला. यावेळी ६० मित्र मैत्रिणीची गाठ भेट झाली.ती केवळ एक भेट नव्हती तर तो जुन्या आठवणींच्या एक जिवंत झरा होता. काय रे, ओळखलस का मला? ज्याच्या त्याच्या तोंडी हाच जीव्हाळ्याचा प्रश्न..
सर्वांनी वर्ग खोलीमध्ये बसून जुन्या आठवणींना उजाळा दिला. जे मित्र आज हयात नाहीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. काही प्रकृती अस्वस्थतेमुळे येऊ शकले नाहीत त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी सद्भावना व्यक्त करण्यात आली.
मुरमाडी / तुप. येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २००१-२००३ च्या वर्ग ११,१२ वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजन व शाळेसंदर्भात काही देणे आहे. या उद्देशाने स्नेहमिलन सोहळा आयोजित केला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून के. जे. भेंडारकर सर, प्रमुख अतिथी बी.डी.बोरकर सर, त्या वेळेस असलेले वर्गशिक्षक प्रा. डी.एस. आकरे सर, शिक्षक प्रा. युवराज खोब्रागडे सर, प्रा. दिगंबर निखाडे सर, विद्या भोयर(मते मॅडम) तसेच विद्यालयाचे प्राचार्य सिंधीमेश्राम सर, ईश्वरकरसर, आदी उपस्थित होते.
विद्यार्थी व शिक्षक यातील नाते हे एक पिढी घडविणारे असल्याने याची जाण विद्यार्थी यांनी ठेवून शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शन व शिकवणुकीची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास वत्यानुसार वर्तन व आचरण केल्यास भावी पिढी ही सक्षम बनून देश घडविण्यासाठी त्यांचा हातभार लागू शकते, असे प्रतिपादन जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय मुरमाडी तुपकर येथे आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले तब्बल दोन पिढ्याना शिक्षणा चा दान देणारे बी. डी. बोरकर सर यांनी विचार व्यक्त केले .
या प्रसंगी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी २३ वर्षापूर्वीच्या आठवणीना उजाळा देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आपण कसे घडलो आपल्या यशामध्ये आमच्या गुरुजनांचा लागलेला हातभार. याचे सविस्तर उल्लेख केला. या कार्यक्रमाचे संचलन शीतल हलमारे(धोटे), दिप्ती हलमारे(बांन्ते), प्रणाली खोब्रागडे(राऊत ) यांनी केलेतर प्रास्ताविक रामलाल मेश्राम, गोवर्धन घुले,आभार मंगेश डहाके, , भानुदास राऊत यांनी मानले. या कार्यक्रमाची मुख्ये धुरा भोजराज गिलोकर यांनी सांभाळली होती .या प्रसंगी स्नेहभोजन तसेच तासिका वर्गशिक्षक प्रा.डी.एस.आकरे सर यांनी घेतली.आणी त्यांचा आवडता विषय प्रेमाचा गुलकंद...विविध खेळ घेण्यात आल्या. डि जे च्या तालावर आणखी ती मस्ती वयाचा भान नाही दिलखुलास तालावर नाचणारे संपूर्ण वर्ग या प्रसंगी जवळपास ६० माजी विद्यार्थी तसेच वर्ग ११,१२ वी मधील माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या