चित्रा न्युज प्रतिनिधी
अकलूज :-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर दोन व मुली नंबर तीन गणेशनगर अकलूज या शाळेत गुढी पाडवा पट वाढवा हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.
शाळा मराठी माझी शाळा मराठी हो...जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले दोन व मुली तीन अकलूज येथे प्रवेशोत्सवा अंतर्गत आज शैक्षणिक गुढी उभारण्यात आली.रांगोळीच्या पायघड्या,फुग्यांची सजावट, डोक्यावर मुकुट,सेल्फी पॉईंट, पहिल्याच दिवशी स्कूल बॅग, गुणवत्तेची गुढी,गोड खाऊ आणि हलगीच्या तालावर मुलांचे झालेले स्वागत.या उपक्रमामुळे मुले आणि पालक खूप आनंदी झाले होते. पालकांनी आपल्या मनोगतातून मराठी शाळेचे महत्त्व सांगितले.सर्व शिक्षकवृंदांच्या कल्पनेतून साकारलेला आजचा प्रवेशोत्सव अविस्मरणीय ठरला.
या कार्यक्रमाप्रसंगी मुले दोनच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुकुमारी अंगुले मॅडम,श्रीमती मनीषा बळवंतराव मॅडम,श्रीमती अंजली अडाणे मॅडम,दत्तात्रय गायकवाड,तय्यब शेख,श्रीकांत राऊत,श्रीमती फातिमा मुलाणी मॅडम,श्रीमती हजराबी बांगी मॅडम तसेच मुली तीन शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय कोरे,महादेव नागणे,श्रीमती रेखा कोळी मॅडम, श्रीमती सुरेय्या कोरबु मॅडम,पांडुरंग मोहिते,समीर कोरबू,श्रीमती वर्षा राणी जाधव मॅडम,करीना शेख मॅडम व शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


0 टिप्पण्या