Ticker

6/recent/ticker-posts

मिस्ड काॅल करा,हवा तो गुटखा मिळवा..!गुटखा तस्करांचा नवा फंडा..!हंडरगुळीत फोफावलाय धंदा..!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-नांदेड परिक्षेञातील चारही जिल्ह्यात उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व लातुरात जि.पो.अधिक्षक अमोल तांबे यांनी नेमलेले पथक लातुर जिल्ह्यातील विविध शहर व गावात गुटखा,खर्रा पकडून त्या तस्करांवर कलम,१२३ भा.न्या.सं. नुसार गुन्हे दाखल करत असल्याचे पेपरामधून वाचण्यात येत असलेतरीही उदगीर तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या हंडरगुळी या गावातील गुटखा तस्कर सं.पथकांच्या हाती का लागत नाही?असा सवाल नागरीकांना अस्वस्थ करत आहे.
कारण,हंडरगुळीचे तस्कर मंडळी परिसरात गुटख्याचा पुरवठा करत असल्याने तो कधीही,कुठेही खुलेआमपने छोटे विक्रेते विकत असलेले बघून 'असे रे कसे गुटखा बंदी,तुझे प्रशासनाने केले हसे' असे म्हटले जाते.
शहाजी उमाप (डीआयजी), अमोल तांबे (एस.पी.) यांचे पथक जिल्ह्यातील विविध ठिकाणी रोज कुठे टपरीवर तर कुठे मेन तस्करांवर रेड करत असल्याच्या बातम्या विविध माध्यमातुन येतात. पण या पथकाचा येथील गुटखा तस्करांवर तिळमाञ परिणाम झाला नाही.म्हणुन शाळा,काॅलेज परिसरात गुटखा,स्वादिष्ट/सुगंधित तंबाखू,सुगंधित खर्रा,मावा खुलेआम विक्री होताना सामान्यांच्या नजरेत पडतो. पण संबंधितांच्या पडत कसे नाही?जाणुनबुजुन तर येथील गुटखा विक्रेत्यांकडे कानाडोळा करत नाहीत ना असा सवाल उपस्थित होत आहे.
मानवी आरोग्यासाठी मोठी हानी पोहंचवणारा गुटखा उत्पादन बंद करुन करोडो रुपयांच्या महसुलावर पाणी सोडले.तसे राज्यातील गुटखा कंपन्या बंद आहेत. माञ,हंडरगुळीतील ते चालबाज गुटखा विक्रेते आय.जी.व एस.पी.च्या पथकांच्याही डोळ्यात धूळ फेकून कधी कर्नाटकातील कमलनगर कधी मानकेश्वर तर कधी उदगीर,अहमदपुर येथून विमल,रजनिगंधा, आरएमडी,बाबा,रत्ना,१२०, ३०० या सारखा गुटखा व सुगंधित तंबाखु आणतात आणि हाळीहंडरगुळी सह सुकणी,वायगाव,वाढवणा बु,वाढवणा खुर्द,खरबवाडी आदी ठिकाणच्या किराणा दुकाण,टपरी व हाॅटेलमध्ये बेभावात विकतात.आणि स्व:ताचा गल्ला भरतात.

किराणा,भुसारच्या मालात विकतात बाबा, रत्ना !

जानेवारी-२५ मध्ये हाळी येथील नामांकित किराणा, भुसार माल विक्री करणारे दुकाणात तत्कालीन पोउप. निरीक्षक कोरके यांनी धाड टाकली आणि बाबा,रत्ना, ३००,१२० आदी पाव लाखांचा सुगंधित तंबाखु, जर्दा आणि २ तस्करांना ताब्यात घेतले होते.अगदी अशा प्रकारे एका किराणा, भुसार मालाचे व्यापारी असलेले बाप-लेक रद्दीमध्ये गुंडाळून गहू,तांदूळ,साखर कट्ट्यात बाबा,रत्ना,१२०, ३०० बेभावात विकतात. अशी माहिती नाव उघड न करण्याच्या अटीवर येथील एका टपरीचालकाने दिली. 

१ मिस्ड काॅलवर गुटखा होतो होमडिलीव्हर

 हंडरगुळीतील गुटखा तस्कर एका मिस्ड काॅलवर विमल,बोल्ड,बाबा,रत्ना- १२०,३००,रजनिगंधा,आर. एम.डी.अशाप्रकारचा जर्दा व गुटखा घरपोच आणुन देतो.अशी माहिती छञपती शिवाजी चौकातील टपरी चालकाने दिली.
 दरम्यान,गुटखा सेवनाने जीवन धोक्यात येते.तसे गुटखा तस्करांमुळे शांतता व सुव्यवस्था ही धोक्यात येऊ शकते.तेंव्हा लातुर जिल्ह्यातील कांही शाळा, काॅलेज,मंदीर ठिकाणच्या विक्रेत्यांवर रेड करुन लाखों रु.चा मुद्देमाल व आरोपींना ताब्यात घेणारे पथक हंडरगुळीत कधी धडकणार याकडे मंदीर परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.

वरिष्ठ पातळीवरुन नेमलेले विविध पथके गुटखा व अन्य अवैध धंद्यावर धाडी टाकत असले तरी वाढवणा पोलीसही गुटखा तस्करी व विक्री करणा-यांची माहिती घेत असून लवकरच गुटखा तस्कर अटकेत असेल.तसेच गुन्हा नोंदवण्यासाठी मोठा स्टाॅक हवा.असे नाही.तर ४,२ पुडे जरी सापडले तरी कलम- १२३ भा.न्या.सं.नुसार गुन्हा नोंदवता येतो.तेंव्हा गुटख्याच्या नादाला कुणी ही लागू नये.जर कुणाला याबद्दल माहिती असेल तर त्वरीत जवळच्या पोलिसांशी संपर्क करावा नाव गुप्त ठेवले जाईल. अशी माहिती सपोनि. सुनिल गायकवाड यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या