Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 117 वी जयंती निमित्त स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : बोपापूर ताडाळा येथे दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी ग्राम जयंती तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे आयोजन गुरुदेव सेवा मंडळ, बोपापूर, शिव छत्रपती युवा क्रीडा मंडळ संलग्न मेरा युवा भारत, चंद्रपूर तसेच युथ सोशलग्राम फाउंडेशन महाराष्ट्र राज्य समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

ग्राम जयंतीच्या निमित्ताने गावाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करण्यात आला. याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी “ग्रामगीता” या ग्रंथातून मांडलेल्या आदर्श गाव संकल्पनेचा विचार पुढे ठेवत स्वच्छता, एकता, शिक्षण आणि समाजसेवा यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. “सेवा हीच धर्म” हा त्यांचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकार करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक  दादाभाऊ मेश्राम, शाळेतील विद्यार्थी, शाळा समितीच्या अध्यक्षा सौ. सरिता कुतरमारे, शाळेच्या भोजन गृहिणी रखुमाबाई कातकर, गट ग्रामपंचायत खापरीच्या सरपंच सौ. पुष्पाताई हिरादेवे, गावचे पोलीस पाटील प्रतिक हिरादेवे, गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन अध्यक्ष विठ्ठल हिरादेवे, ग्रामसेवाधिकारी रुपेश कुतरमारे, सभासद आर्यन कौरासे, सभासद जिवन डंभारे,सभासद तथा ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर कुतरमारे, शिव छत्रपती युवा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सतीश हिरादेवे, कोषाध्यक्ष ओम कुतरमारे, तसेच पंकज हिरादेवे, पांडुरंग हिरादेवे, पांडुरंग कौरासे आदी मान्यवर उपस्थित होते.

या अभियानामध्ये गावातील युवक, नागरिक व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे व परिसर स्वच्छ करण्यात आला. हातात झाडू घेऊन युवकांनी स्वच्छतेचा संदेश देत जनजागृती केली.

कार्यक्रमादरम्यान “एक पाऊल स्वच्छतेकडे, एक पाऊल निरोगी भविष्याकडे” हा संदेश देत नागरिकांना स्वच्छतेची सवय शअंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले.

शया उपक्रमामुळे गावात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून ग्रामस्थांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागींचे आभार मानण्यात आले.आणि या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनाने करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या