Ticker

6/recent/ticker-posts

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे सुयश


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : विवेकानंद ज्ञानपीठ (कॉ.) वरोरा द्वारा संचालित विवेकानंद माध्यमिक विद्यालय भद्रावतीची विद्यार्थिनी कु. श्रेया मिलिंद खोब्रागडे हिने सन २०२५ - २६ या सत्रात इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत भद्रावती शहरात प्रथम क्रमांक प्राप्त करत दैदिप्यमान यश संपादन केले आणि या अंतर्गत प्राप्त होणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी ती पात्र ठरली आहे.
दरवर्षी ही एनएमएमएस परीक्षा आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या विद्यार्थ्यांकरीता घेण्यात येते. 
या परीक्षेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी अश्या चार वर्षांच्या शिक्षणासाठी दरवर्षी १२,०००/- (बारा हजार रुपये) शिष्यवृत्ती मिळत असते. 
कु. श्रेया खोब्रागडेच्या या यशामागे विद्यालयातील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक दयाकर मग्गीडवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कल्पना बांदूरकर, शिक्षक वृंद आशा गावंडे, तुकाराम पोफळे, संजय आगलावे आदींनी परिश्रम घेऊन यश मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले. 
या घवघवीत यशाबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ (कॉ.) वरोरा संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, संस्थेचे सचिव अमन टेमुर्डे तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक दयाकर मग्गीडवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कल्पना बांदूरकर, शिक्षक वृंद आशा गावंडे, तुकाराम पोफळे, संजय आगलावे, मेघा उलमाले, जयश्री रोडे, प्रमोद लांडगे आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद विनोद गावंडे, रामदास ठक, बंडू कांबळे आदींनी कु. श्रेयाचे अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या