चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर : रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांना " अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व सांस्कृतिक संवर्धन महामंडळ ह्यूमन राईट स असोसिएशन ऑफ इंडिया (तेलंगणा राज्य ) यांच्यावतीने " महाकवी वामनदादा कर्डक राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज भीमशाहीर प्रदीप बागवान कडबे यांनी सामाजिक , कला , ग्रंथालय, पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय मोलाचे कार्य केले आहे. हा राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दिनांक - 29 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजता गोयेगाव मंडल, केरा मेरी, जिल्हा कु मराव भीम, आसिफाबाद तेलंगणा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भीम शाहीर प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनाचा माध्यमातून क्रांतिकारी महापुरुषांचे विज्ञानवादी विचार मांडून, बुद्ध भीम गीतांचा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम कार्यक्रम करीत आहे. पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटू न त्यांचा कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक समिती अध्यक्ष - तारू नगरारे, दत्तू ताकसांडे, प्रधान कार्यकर्ता एम शंकर, टी आनंदराव , कवी साहित्यिक मधुबावलकर, एडवोकेट सत्यपाल कातकर, भीम शाहीर सदानंद मोरे , कवी के पाटील, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांनी जास्तीत जास्त संख्येने कलावंतांनी या कार्यक्रमला उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या