Ticker

6/recent/ticker-posts

एल.एल.एम. मध्ये प्रथम क्रमांक ॲड. पुजा मत्ते यांना गोल्ड मेडल

"ध्येय वेडी सावित्रीची लेक" ॲड. पूजा मत्ते हिचा मॉजिस्टेट होण्याच्या दिशेने वाटचाल


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : ध्येय,जिध्द आणि  चिकाटी असली तर माणूस  यशा पर्यंत नक्कीच पोहचते. पण  माणसाची ध्येय मोठी पाहिजेत कारण लहान ध्येय माणसाला लहान विचारांत अडकवतात मोठं सप्न पाहिलं की माणूस स्वत:लाच ओलांडु लागतो. ध्येय मोठं असलं की अडचणी मोठ्या  वाटत नाहीत तर पायऱ्या वाटतात. ज्याचं ध्येय मोठं असतं तो वेळ वाया घालत नाही. लोक हसतात. शंका घेतात पण ध्येय असलेला माणूस शांतपणे पुढे चालत राहतो. मोठी ध्येय माणसाला शिस्त शिकवतात आणि ध्यैर्य देतात.अपयश आलं तरी तो थांबत नाही. कारण त्याला मंजिल दिसत असते. मोठंध्येय अहंकार देत नाही तर जबाबदारीची जाणीव करून देतं माणूस जसा विचार करतो तसाच तो घडतो. ध्येय नसलेला माणूस परिस्थितीवर जगतो तर ध्येय असलेला माणूस परिस्थिती घडवतो. म्हणून माणसाची ध्येय मोठी पाहिजेत कारण तीच त्याला सामान्यतेतून वेगळ करतात.
अशीच एक मारेगाव तालुक्यातील वनोजा (देवी ) येथील "ध्येय वेडी सावित्रीची लेक" ॲड. पूजा देवराव मत्ते हि अत्यंत एका गरिब कुटूंबातील पूजा हिचे वडिल देवराव मत्ते हा गावात बेलदारी काम व आई शोभा गृहिणी असून ही शेतमजूरी करतात या हलाकिच्या परिस्तिथी पूजा हिने  आपले स्वप्न पुर्ण करण्याकरीता  आपल्या जिद्दीच्या भरोशावर कठिण परिस्थितीत शांताराम पोटदुखे लॉ कॉलेज चंद्रपूर येथे प्रवेश घेऊन कठोर परिश्रम, सातत्यपुर्ण अभ्यास करून  वकिली कोर्स पुर्ण करुन वनोजा (देवी ) या गावाचे व परिसराचे नाव मोठे करत  "पहिली सावित्रिची लेक" वकिल झाल्याचा मान मिळविला  हे मात्र विशेष कैतूकास्पद आहे. देवराव मत्ते व शोभा यांना तिन मुली आहे. मोठ्या दोन मुलिंचे शिक्षण पुर्ण करून पार्लर कोर्स केला आहे. या दोघींचेही  लग्न झाले. मात्र पुजा हिचे स्वप्न मोठे असून माॅजिस्टेट होण्याच्या दिशेने अभ्यास चालु असल्याचे सांगण्यात आले आहे. 

नुक्ताच शांताराम पोटदुखे लॉ कॉलेज, चंद्रपूर येथे दिनांक ३० मार्च २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात आला.
‎
एल.एल.एम. (LL.M.) अभ्यासक्रम २०२२-२३ मध्ये कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीच्या जोरावर ॲड. पूजा देवराव मत्ते यांनी प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल मिळवले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना विशेष सन्मानित करण्यात आले. हे सुवर्णपदक डॉ. कापसे  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

‎      यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एजाज शेख, चंद्रपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विक्रम टंडन, तसेच इतर प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी ॲड. पूजा मत्ते यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या