Ticker

6/recent/ticker-posts

सोनई महिला मंडळ मगणपुरा नांदेड वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 'अन्नदान'पाणी वाटप उपक्रम


 चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड -  डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ खिचडी व पाणी बॉटल वाटप; मान्यवरांची उपस्थिती
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच औचित्याने सोनई महिला मंडळ मगणपुरा वतीने शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा भागात सामाजिक बांधिलकी जपत  खिचडी व पाणी वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन या अन्नदान कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड उत्तर चे भाजपाचे अध्यक्ष मा. श्री. किशोरभाऊ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेडचा DIG श्री शहाजी उमाप, नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, अप्पारजिल्हाधिकारी किरण आंबेकर समाज कल्याण आयुक्त, मिनगिरे साहेब,भिकू गण , नांदेड जिल्ह्याचे उत्तर चे आमदार बालाजी कल्याणकर, नांदेड जिल्ह्याचे दक्षिण आमदार अनंत बोडरकर, माजी सभापती नरेंद्र गायकवाड यांची उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांच्या हस्ते जयंतीनिमित्त अभिवादन करून नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
आयोजक आणि मान्यवर उपस्थिती
सदर कार्यक्रमाचे नेटके आयोजन लक्ष्मी संजय वाघमारे , अश्विन सोनुले, सविता बेटके  राहुल ग्राहक सेवा केंद्र चे नाव मोंढा चे राहुल जोंधळे नांदेड यांच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी महादेवी मठपती, भाजप प्रदेश सचिव, लीना गायकवाड भाजप महिला मोर्चा च्या उपाध्यक्ष, संजय बेटके, सुमित कदम, गौतम जोंधळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवाराची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नांदेड शहरा परिसरातील शेकडो नागरिकांनी आणि प्रवाशांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सामाजिक समरसता वाढवण्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहेत," अशी भावना यावेळी आयोजक व मान्यवरांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या