चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा : महात्मा ज्योतिराव फुले यांची १९९ वी जयंती ओबीसी क्रांती मोर्चा च्या वतीने भंडारा येथे उत्साहात साजरी करण्यात आली आहे. नागरिकांच्या उपस्थितीत फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
समानता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्पही उपस्थितांनी व्यक्त केला.
जातीय भेदभाव, अंधश्रद्धा आणि अन्यायाच्या अंधारात सत्य, शिक्षण आणि समानतेची ज्योत पेटवणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी मागासवर्गीय, शूद्र-अतिशूद्र आणि वंचित समाजाच्या उद्धारासाठी ‘सत्यशोधक समाज’ स्थापन करून सामाजिक क्रांतीची ठिणगी चेतवली.
अस्पृश्य मानल्या गेलेल्या मुला-मुलींसाठी शाळा सुरू करून शिक्षणाचा हक्क सर्वांसाठी खुला केला. स्वतःच्या घरातील पाण्याची टाकीही सर्वांसाठी खुली करून मानवतेचा खरा अर्थ जगासमोर ठेवला. स्त्री शिक्षणाचा पाया रचत पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना घडवून भारतातील पहिल्या महिला शिक्षिका निर्माण केल्या.
बालविवाहाला विरोध, विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा आणि बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापून समाज सुधारण्याचा नवा अध्याय लिहिला. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाची सुरुवात होत आहे. चला, या वर्षात त्यांच्या विचारांना घराघरात, मनामनात पोहोचवण्याचा संकल्प करूया. समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला पुढे नेऊया!
महात्मा फुले यांना शतशः नमन!
1)सावित्री बाई फुले - मीर भांडारकर, 2)फातिमा शेख - सानिध्या मेश्राम,
3) महात्मा जोतिबा फुले -जयस भांडारकर, 4)पूजा पाटील, 5) कोमल दुबे, 6)अनुज पाटिल, 7) अनुष्का पाटील, 8) मनीषा भांडारकर, वेदांत हटवार, नेहा मंदुरकर, दिव्या मंदुरकर, ममता हटवार, अनुसया मंदुरकर, कांताबाई वडदकर, चंद्रभागा तोरणकर, यशवंती लांजेवार, विनायक लांजेवार, अंजिरा भेदे, मानापुरे काकू, नित्या नंदुरकर, यतार्थ मंदुरकर, आदिरा तोरणकर, पियु मानापुरे व वार्डातील बाल गोपाल उपस्थित होते. संजय मते ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष अनिल कडव यशवंत सूर्यवंशी जीवन भजन कर राजपूत सर प्रकाश मुटकुरे आषीष चन्नेसुरेंद्र मोडघरे अमित मेहर दिलीप उमाळे बंडू नक्षलवार अजित शेख बबन बुधे सुधीर सर्वे उमेश मोहतुरे शोभा बावनकर इत्यादी उपस्थित होते.
………………………………….


0 टिप्पण्या