Ticker

6/recent/ticker-posts

मद्यमुक्ती करीता लाखनीच्या विनामुल्य सभेला या किंवा दारूपिडीत बांधवांना अवश्य आणा

 

◻️पंढरपूर व जळगाव येथील मार्गदर्शक सदस्यांचे साकोलीतून जनतेला आवाहन • 

◻️अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस, महाराष्ट्र सेवा समितीच्या कार्यक्रमात लाखनीत येणार शनिवारी राज्यभरातून शेकडो बांधव. 

 चित्रा न्युज प्रतिनिधी 
 लाखनी : "मद्यपाश" नावाचा हा एक जीवघेणा आजार आहे. आणि या अती भयानक आजाराचा शेवट व अंत अकाली मृत्यूच आहे. हा आजार ज्याला मनातून कळला तो जीवनात कधीच दारूला हाथ लावित नाही. असे प्रतिपादन काल ( गुरूवार ०९ एप्रिल ) ला पंढरपूर व जळगाव येथून आलेले "अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस" महाराष्ट्र सेवा समितीचे मार्गदर्शक सदस्य दिलीप बी. व संतोष जी. यांनी केले. त्यांनी समस्त जनतेला आवाहन केले की, शनिवार ११ एप्रिलला सायं. ४ वाजता बडगे सेलिब्रेशन हॉल, केसलवाडा रोड लाखनी येथे होणा-या मोफत जनजागरण सभेला मद्यपिडीत बांधवांना त्यांच्या कुटुंबातील जागृत सदस्यांनी घेऊन येण्याचे आवाहन सुद्धा केले आहे. 

🌎 ही काही जाहिरात, ॲडव्हर्टायझिंग नाही. तर महाराष्ट्र शासन कडून राज्यस्तरीय "राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार मिळालेल्या "अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस" या जागतिक स्तरावरील संघटनेचे जनहितार्थ आवाहन आहे. 

🔊 मोफत मदतीसाठी संपर्क - 9763536393, 9370687065, 9405504140, 7620375044, 7744991910 

🌎 AA Seva Samiti Maharashtra Helpline - 022 23016767
9022771011

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या