Ticker

6/recent/ticker-posts

नवजीवन येथे जागतिक वसुंधरा दिन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली : नवजीवन कॉन्व्हेन्ट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल (सीबीएसई) येथे जागतिक वसुंधरा दिन शाळेचे व्यवस्थापक विनोद किरपान, प्राचार्या भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी सतीश गोटेफोडे तसेच पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले..कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात रोपे लावून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. तसेच ‘पर्यावरण वाचवा’ या विषयावर घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले व प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना पृथ्वीच्या संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या