Ticker

6/recent/ticker-posts

माढा नगरपंचायत व श्रीपुर-महाळुंग नगरपंचायतीस मोठा दिलासा – आमदार अभिजीत पाटीर यांच्या मागणीला यश..


चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-माढा  मतदार संघाच्या सर्वांगीण नागरी विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर मोठे यश मिळाले असून महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान” अंतर्गत माढा नगरपंचायत व श्रीपुर महाळुंग नगरपंचायतीस प्रत्येकी रुपये १ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

हा निधी मंजूर व्हावा यासाठी आमदार अभिजीत पाटील यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून माढा  मतदारसंघाच्या नागरी विकासाचा प्रश्न ठामपणे मांडला होता. त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच आज तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सदर निधीतून शहरातील मराठी शाळांची गुणवत्ता वाढविणे, महिला आरोग्य सुविधा मजबूत करणे, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन तसेच पर्यटन विकासाला चालना देणारी विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवनमानात निश्चितच सकारात्मक बदल घडून येणार आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मा. मुख्यमंत्री तसेच दोन्ही मा. उपमुख्यमंत्री आणि नगर विकास खात्याचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाला गती मिळत असून माढा  मतदार संघालाही त्याचा मोठा फायदा होत आहे.

आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली माढा  मतदार संघ विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून येणाऱ्या काळातही असेच विकासात्मक निर्णय मिळत राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या