Ticker

6/recent/ticker-posts

नाशिकमध्ये महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : समाज प्रतिबिंब बहुद्देशीय संस्था व बी एस एफ बहुद्देशीय संस्था, सत् कबीर बहुद्देशीय संस्था आणि उपेक्षित नायक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नाशिक मध्ये करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सामाजिक, कृषी, क्रीडा, उद्योग, शैक्षणिक, संस्था, प्रशासकीय, कला व अन्य विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ७० लोकांना हा महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थिती मध्ये हा पुरस्कार सोहळा मे महिन्यात नाशिक येथे पार पडणार आहे अशी माहिती कार्यक्रम मुख्य आयोजक भूषण सरदार यांनी दिली. पुरस्कार प्रस्ताव अधिक माहितीसाठी 9420621994 वर सपंर्क करावा असें आवाहन आयोजन समितीने केले आहे. कार्यक्रमाचा उद्देश वृद्धाश्रम उभारणे हा आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार रामभाऊ आवारे, पत्रकार मुकुंद आव्हाड, डॉ. शाम जाधव, पत्रकार अश्विनी पुरी, पत्रकार विष्णू गायकवाड, राजनंदिनी अहिरे, वैशाली सोनवणे, कु. अश्विनी सांगळे, शिक्षिका प्रिती म्हसदे, शंकरराव कन्हेरकर, संजय पाटील, पत्रकार संजय बच्छाव, डॉ रावसाहेब घोडेराव, योगिता दांडगे, शिक्षक दादाराव सुखधाने, पत्रकार रोशन गव्हाणे, वैशाली सूर्यवंशी,शिक्षक सोपान वाघमारे, पत्रकार सुरेखा गांगुर्डे, जयश्री बसते, देविदास सोनवणे, मनिष मुथा सम्पूर्ण आयोजन समिती कार्यरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या