आ.संजय गायकवाड व धीरेंद्र शास्त्री बागेश्वर यांचे वर कारवाई करा पोलीस प्रशासनाला निवेदन
चित्रा न्युज प्रतिनिधी
माहूर- ४० वर्षापूर्वी कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले छत्रपती शिवरायांच्या अस्सल जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारे “ शिवाजी कोण होता ? या पुस्तकाच्या शिर्षकावरून बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सध्याचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या आई व पत्नी बाबत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तसेच नागपूर येथील एका जाहीर कार्यक्रमात धीरेंद्र बागेश्वर नावाच्या व्यक्तीने छत्रपती शिवरायांबाबत अनैतीहासिक व खोटे वक्तव्य केल्याने अभ्यासू शिवप्रेमीमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
त्यामुळे माहूर तालुक्यातील संभाजी ब्रिगेड, कम्युनिस्ट पक्ष, अंधश्रद्धा निर्मुलन समिती व परिवर्तनादी व पुरोगामी विचाराच्या संघटनांच्या वतीने दि. २७ रोजी सायंकाळी ६ वा माहूर येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर चौक येथे कॉ. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता ? या पुस्तकाचे जाहीर वाचन करण्यात आले. यावेळी कॉ. डॉ. बाबा डाखोरे, जेष्ठ पत्रकार तथा विचारवंत कादरभाई दोसानी, कॉ. किशोर पवार, अंनिसचे तालुकाध्यक्ष मनोज कीर्तने प्रधान मुख्य सचिव जयकुमार अडकीने संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष मंगेश जाधव हडसनीकर, प्रवीण बरडे, समाधान कांबळे, निरंजन जमदाडे, दीपक कांबळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कॉ. डॉ. बाबा डाखोरे, जेष्ठ पत्रकार तथा विचारवंत कादरभाई दोसानी, कॉ. किशोर पवार, अंनिसचे तालुकाध्यक्ष मनोज कीर्तने प्रधान मुख्य सचिव जयकुमार अडकीने यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून आ. संजय गायकवाड व धीरेंद्र शास्त्री बागेश्वर यांचा खरपूस समाचार घेतला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन माकप चे जिल्हा उपाध्यक्ष कॉ.किशोर पवार यांनी केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व शिवाजी कोण होता ? या पुस्तकाचे लेखक स्मृतिशेष कॉ. गोविंद पानसरे यांच्या बाबत अवमानकारक वक्तव्य करून प्रकाशक प्रशांत आंबी यांना मोबाईल व्दारे त्यांच्या आई व पत्नीबाबत अर्वाच्च व अश्लील भाषेत शिवीगाळ करून दहशत निर्माण केल्या प्रकरणी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे विरुद्ध, तसेच छत्रपती शिवरायाबाबत आक्षेपार्ह अनऐतिहासिक व खोटे वक्तव्य करणाऱ्या धीरेद्र शास्त्री बागेश्वर यांचे विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन स.पो.नि. शरद घोडके यांचे मार्फत पोलीस प्रशासनास सादर करण्यात आले.


0 टिप्पण्या