चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली: रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई मार्फत आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत यशाची परंपरा कायम ठेवत विविध प्रकारच्या बक्षिसांवर आपले नाव कोरले. रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई ही संस्था विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करते. विद्यार्थ्यांनी विविध रंग, ब्रश, पेन्सिल आणि चित्रकौशल्य वापरून या स्पर्धेत भाग घेतात. सदर आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे जगातील एकूण १० देशांमध्ये आयोजन केले जाते. आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे विषय कलर कॉम्पिटिशन,फिंगर अँड थम कॉम्पिटिशन, स्केचिंग कॉम्पिटिशन,कार्टून मेकिंग कॉम्पिटिशन , स्केचिंग कॉम्पिटिशन या सर्व स्पर्धेमध्ये शाळेतील नर्सरी ते ७ वर्गापर्यंत एकूण ३१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा दोन टप्यात घेतली जाते. चित्रकला स्पर्धा शाळेचे कलाशिक्षक कार्तिक पी. लांजेवार यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. त्याचप्रमाणे शाळेचे प्राचार्य निकेशन देऊरमल्ले व शाळेच्या संचालिका सौ.नमिता अजय तुमसरे यांचे विशेष योगदान लाभले. त्याचप्रमाणे सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना विशेष आकर्षक पुरस्कार त्याचप्रमाणे प्रमाणपत्र मेडल आणि ट्रॉफी देण्यात आली. शाळेमध्ये मुलांच्या बुद्धिमत्तेच्या कल्पनेला आकार देण्यासाठी असेच निरनिराळे स्पर्धा शाळा राबवत असते.
या रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेत विधी लोहिया वर्ग ५ प्रथम क्रमांक मिळवून शाळेत पहिली आली. तिला व्हिडिओ प्रोजेक्टर, प्रमाणपत्र व ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. अनन्या भिमटे वर्ग ६ द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. तिला बक्षीस म्हणून क्रिकेट किट, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देण्यात आली. हर्ष कापगते वर्ग ४ द्वितीय क्रमांक मिळवून साउंड बार व ट्रॉफी देवून गौरविण्यात आले..युगांश बिसेन वर्ग ३ तृतीय क्रमांक मिळवून बिग साइज हेडफोन व ट्रॉफी चा मानकरी ठरला. त्यासोबत लिबान खान याला कलावंत पुरस्कार प्राप्त झाला. त्याला स्कूल बॅग व ट्रॉफी बक्षिस देण्यात आले. यावेळी रंगोत्सव सेलिब्रेशन चित्रकला स्पर्धेतर्फे शाळेला विशेष पुरस्कार देण्यात आला. तसेच कु. पल्लवी ओझा यांनी विशेष मेहनत घेतली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यास्मिन तुरक यांनी केले तर आभार प्रदर्शन अश्विनी झलके यांनी व्यक्त केले.


0 टिप्पण्या