Ticker

6/recent/ticker-posts

हाळीत डीजे विना आंबेडकर जयंतीनिळ्या आकाशाखाली उसळला निळा समुद्र

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-हाळी ता.उदगीर येथे दि.२६ रोजी जयंती निमित्ताने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचिञाची हजारो बौध्द उपासक व उपासिका यांच्या उपस्थित मिरवणुक काढण्यात आली.
या मिरवणुकीचे वैशिष्ट्य हे की यावर्षी प्रथमच डीजे न लावता निळ्या आकाशाखाली निळासागर डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय,जयकार व त्यांना अभिवादन करत होता.
हाळी नगरीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी.जयंती निमित्त दि.२६ रोजी उत्साहात व मंगलमय वातावरणात मिरवणुक काढण्यात आली.या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी डीजेचा दणदणाट नव्हता.कारण,पोलिस उप विभागीय अधिकारी अरविंद रायबोले यांनी डीजे चा वापर करु नका.अन्यथा,कारवाई अटळ.असे शांतता समितीच्या बैठकीत सांगितले होते. म्हणुन डीजेचा दणदणाट झाला नाही.म्हणुन सुटकेचा नि:श्र्वास सोडलेल्या हाळीकरांनी पोलिस प्रशासनाचे व जयंती समितीचे आभार व कौतूक केले आहे.
पं.स.उपसभापती विक्की पाटील,माजी उप सरपंच राजु पाटील यांचा जयंती उत्सव समितीने यथोचित सत्कार केला.

एप्रिल महिण्यातील शेवटी येणा-या रविवारी आंबेडकर जयंती निमित्त मिरवणुक काढण्याची प्रथा या वर्षी ही कायम होती.फरक एवढाच की,यावर्षी डीजेचा दणका नव्हता.प्रशासनाने डीजेचा वापर न करण्याचे केलेल्या आवाहनास जयंती समिती ने प्रतिसाद दिला.आणि ही मिरवणुक डीजेविना साजरी केली.यावेळी गैरप्रकार टाळण्यासाठी डीवायएसपी.अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी.एस.पी. गायकवाड,पोउपनि.प्रवीण हालसे,हेकाॅ.रंगवाळ शिवप्रताप,पोकाॅ.दत्ताञ्य वाडकर,दयानंद(सोनू)  सोनकांबळे इत्यादींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या