Ticker

6/recent/ticker-posts

शंकर गाडी पुजेला घेऊन गेला आणि वाघाने तिकडे ठेवला

 वाघाच्या हल्यात ईसम ठार चिमुर तालुक्यातिल घटना


चित्रा न्युज प्रतिनिधी 
वरोरा : चिमूर तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाहनगाव या वनक्षेत्रात गाडीची पुजा करण्याकरीता गेले असता वाघाने हल्ला करून एका इसमाला ठार केले. 

प्राप्त माहिती नुसार आदिवासी समाज नियमित वन देवतेला पूज्यनीय मानून त्याची पूजा अर्चा नेहमी करत असतात. यातच चैत्र नवरात्रीपासून ते बुद्ध पौर्णिमा पर्यंत आदिवासी बांधव हे गोंडी देवाची मोठ्या प्रमाणात पूजा अर्चना करतात. त्यांचे देव जंगलामध्ये मोहाच्या झाडावर बांधलेले असतात अशातच काल वाहनगाव येथील शंकर दादाजी मसराम वय वर्ष ४८ धंदा मजुरी यांनी नवीन दुचाकी घेतल्यामुळे गावालगत असलेल्या जंगलाच्या आपल्या श्रद्धास्थानी जाऊन पूजा करीत असताना जवळपास दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना ठार केले‌.  

यावेळी घरच्यांना वाटले की शंकर मसराम हे नेरीला राहत असल्यामुळे तिथे गेले असेल परंतु काल रात्रीपर्यंत ते नेरी ला सुद्धा पोहोचले नसल्यामुळे आज सकाळी घरच्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली त्यानंतर वन विभागाच्या मदतीने जंगलामध्ये शोध घेतले असतांना  श्रध्दास्थानी गेले असता पूजनाच्या २०० ते ३०० मीटर पर्यंत मसराम यांचे काही अवशेष आढळून आले त्यानंतर सदर अवशेष उत्तरीय तपासणीसाठी वरोरा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले. व घटनेचा पुढील तपास शेगावचे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांचे मार्गदर्शनात शेगाव पोलीस करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या