Ticker

6/recent/ticker-posts

खिस्तानंद रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर सह दोन महिलेला अंधत्व...

आरोग्य प्रशासनाने ठोकले ख्रिस्तानंद हॉस्पिटलला सील


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणा मुळे तीन रुग्णांना अंधत्व झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात घडली.अंधत्व आलेल्यांमध्ये एका होमिओ पॅथी डॉक्टर सह दोन महिलांचा समावेश आहे.

ब्रम्हपुरी तालुक्यातील अत्यंत नामांकित आणि सेवाभावी समजल्या जाणाऱ्या खिस्तानंद रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना जंतुसंसर्ग होऊन होमिओ पॅथी डॉक्टर सह दोन महिलांनी दृष्टी गेल्याची तक्रार १७ मार्च ला जिल्हा शल्य चिकित्सक यांना इ मेल द्वारे व लेखी स्वरूपात प्राप्त झाली.तक्रारीची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत जिल्हा प्रोग्रॅम मॅनेजर अंतर्गत ४ डॉक्टरांची एक विशेष चौकशी समिती नियुक्त केली. चौकशी समितीने रुग्णालयाची प्राथमिक पाहणी केली असता, हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र नेत्ररोग खाटा मंजूर नसतानाही तिथे अवैधरीत्या नेत्र शस्त्रक्रियागृह चालविले जात होते.
रुग्णालयात आढळलेली प्रचंड अनियमितता आणि 'बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट, १९४९' अंतर्गत असलेल्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याचे आढळले.
सोमवारी या रुग्णालयाची नोंदणी रद्द करून ऑपरेशन थिएटर आणि नर्सिंग होमशी संबंधित इतर महत्त्वाचे विभाग सील केले.ख्रिश्चन मिशनरी चालवणाऱ्या जाणाऱ्या या रुग्णालयात अल्पदरात सेवा असल्याने रुग्णांची येण्याची संख्या फार मोठी असते. मात्र मागील काही दिवसांपूर्वी इथे झालेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर तीन रुग्णांना अंधत्व आले.

महाराष्ट्र शासनाच्या २०१० ला काढलेल्या परिपत्रका नुसार या प्रकरणात जिल्हा शासकीय रुग्णालयाद्वारे कमिटी तयार करून या कमिटी द्वारे पुढील तपास करण्यात येणार आहे.

या प्रकरणाची माहिती आरोग्य संचालकांला देण्यात येणार आहे.तसेच या ख्रिश्चन मिशनरी हॉस्पिटलमध्ये चालणाऱ्या शासकीय योजनांना तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या असल्याची माहिती चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.या कारवाईमुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
--------------------------------------
चौकशीत दोषीवर कारवाई...!
प्राथमिक चौकशीत आढळून आलेल्या गंभीर परिस्थितीवरून आणि नियमांच्या उल्लंघनामुळे रुग्णालयाचे ऑपरेशन थिएटर सील करण्यात आले. असून, नोंदणी रद्द करण्यात आली आहे. सखोल चौकशीत डॉक्टर व हॉस्पिटल प्रशासन दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल.

डॉ.महादेव चिंचोले, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या