Ticker

6/recent/ticker-posts

नवजीवन कॉन्व्हेंट स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल (CBSE) जामनापूर/साकोली येथील इयत्ता दहावी (AISSE 2025-26) चा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या नावात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या परीक्षेत राधिका नामदेव कापगते हिने 95.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. युक्ती कालिदास गहाणे 95.20 टक्के गुणांसह द्वितीय, रुची रुपलाल पारधी 92.80 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. तसेच हिमानी होलिराम टेंभूरकर (91.20%) व पार्थ प्रशांत हाडगे (90.60%) यांनीही उल्लेखनीय यश मिळविले. तसेच प्रवीण्य श्रेणी मध्ये तब्बल 28, प्रथम श्रेणी मध्ये 34 तर 4 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत. या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकवृंद व सहकार्य करणाऱ्या पालकांचे शाळेचे संस्था संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, संस्था अध्यक्ष सोमदत्त करंजेकर, सचिव वृंदाताई करंजेकर, शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, प्राचार्या भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे व पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर यांनी अभिनंदन व कौतुक करून भावी वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यामुळेच हा उज्ज्वल निकाल साध्य झाला असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या