महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 जयंती उत्साहात साजरी.
" उद्धारली कोटी कुळे, भिमा तुझ्या जन्मामुळे "
चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती द्वारा आयोजित, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती " सुवर्ण नगर, येथील समाज भवन, उत्तर नागपूर मध्ये दिनांक -13 एप्रिल 2026 ते 17 एप्रिल 2026 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप बागवान क डबे यांचा संपूर्ण संच गुरुवार दिनांक- 16 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनातून- लोककवी वामनदादा कर्डक " उद्धारली कोटी कुळे,भिमा तुझ्या जन्मामुळे, एक ज्ञान ज्योतीने,कोटी कोटी ज्योती, तळपतात तेजा ने तुझ्या धरेवरती उजडे,काळोख मावळे, भीमा तुझ्या जन्मामुळे, क्रांतिकारी गीत सादर केले. यावेळी शाहीर अरुण मेश्राम, दिलीप मेश्राम, शंकर मौ तकर, भारत नागोसे तबलावादक, दिलीप सेलोकर ना ल वादक, रवी उरकुडे बँजो वादक, सुप्रसिद्ध गायिका नीलकमल गोंडाणे, या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक - बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते सुरेश महाजन, सुनील धमगाये, दादाराव जांभुळकर, संघरक्षित वासनिक, उमाकांत मेश्राम, लता भोवते, उषा गणवीर, सामाजिक कार्यकर्ते श्रीराम डोंगरे, राकेश रंगारी, सामाजिक कार्यकर्ते किशोर बेहाडे, राजेश गजभिये, राहुल गजभिये, कैलास मेश्राम आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या