जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल.
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : दिनांक १३/४/२०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील मौजा कुंसूबीचा पाच आदीवासी यांनी, में मानीकगड सिमेंट कंपनी व महसूल अधिकारी विरुद्ध शेतमीनीचा मोबदला मिळण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयातच विष प्राशन केले.
अनेकांची तब्येत गंभीर असून पुढिल उपचारा करीता जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
यात विष करमणाऱ्यांची नावे याप्रमाणे लच्चु चिन्नु मडावी ( ५५) रा. आंबेझरी, जयराम गंगु मडावी ( ४५) रा.नोकारी, जंगु सोमा पेंदोर ( ४८) रा. कुसुंबी, बालाजी शिडाम ( ५२) रा. नोकारी व मारोती कर्णू तलांडे (५५) रा. कुसुंबी
सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या न्यायालयात विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते यांनी क्रिमीनल रिट पीटीशन नंबर ६५७/२०२१ दाखल केली आहे. ती पीटीशन सुमोठो अँक्शन घेऊन जनहीत याचीकेत रूपांतर करावे.
*काय आहे नेमके हे प्रकरण*
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील मौजा कुंसूबीचा आदीवासीचां हा प्रश्न मागील ४५ वर्षापासुन रेंगाळत होता व आजही रेंगाळत आहे.
कुंसूबीचा आदीवासीची खाजगी मालकीची जमीन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी में मानीकगड सिमेंट कंपनीला वार्षिक भाड्याने भुपूष्ठभाग दिला होता, खोदण्यासाठी नव्हते. मात्र सदर कंपनीने शर्ती व अटीचा भंग करून,भाड्याने जमीन घेऊन अवैधरित्या चुनखडीचे उत्खनन करीत होते.आणि आजही आहे.
में मानीकगड सिमेंट कंपनीने २००-२५० फुट खोल खड्डे करून अवैध चुनखडीचे उत्खनन सुरू आहे, मोठ्या प्रमाणात वन जमीनीची नुकसान केले आहे, प्रदुषण नियंत्रण मंडळाची कुठलीही परवानगी नसताना, मोठ्या प्रमाणात कंपनी प्रदुषण करीत आहे, मोठ्या प्रमाणात औद्योगिक अकुषीक सारा ४५ वर्षापासुन बुडविला आहे, तरीही महसूल अधिकारी मुंग गिळून गप्प आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६चा कलम १८०नुसार में मानीकगड सिमेंट कंपनी विरुद्ध जप्तीची कारवाई महसूल अधिकारी यांनी केली असती, तर अनेक आदिवासी यांना न्याय व हक्क तेव्हाच मिळाला असता,व शासनाला सुद्धा शेकडो करोडो रुपये महसूल मिळाला असता.
महसूल अधिकारी ४५वर्षापासून मुंग गिळून चुपचाप का आहेत?
आखीर पाणी कुठे मुरत आहे.विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते तथा पटवारी यांच्या रोखठोक सवाल


0 टिप्पण्या