Ticker

6/recent/ticker-posts

वऱ्हाड्यांच्या व्हॅनला ट्रकची भीषण धडक; पाच ठार, चार जखमी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अड्याळ :-भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथे लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या व्हॅनला ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना गुरुवारी (दि. 23 एप्रिल) रात्री सुमारे ९:४५ वाजताच्या सुमारास अड्याळ परिसरातील महामार्गावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अड्याळ गावातील लग्न समारंभ आटोपून वऱ्हाडी मंडळी व्हॅनने परतत होती. त्यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने व्हॅनला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की व्हॅनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
या अपघातात मृतांमध्ये पप्पू पुंडलिक नगरे (वय १६), प्रभाकर चाकरकर (४८), मुनली प्रभाकर चाकरकर (४३), नयना देवराम नगरे (१८) आणि दुर्गा देवराम नगरे (४२) यांचा समावेश आहे. तसेच चालक सोहम जागेश्वर गोडाम (२५) यांच्यासह उमेश सोनवणे (२४), रेखा खेडकर (२०) आणि स्नेहा गिरीधर नन्ने (१८) हे जखमी झाले असून त्यांच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या