Ticker

6/recent/ticker-posts

मानीकगड सिमे़ंट कंपणीचे अधिकारी यांच्यावर होणार अट्रासिटी गुन्हा दाखल

चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : मौजा कुंसूबी येथील  १५७ एकर शेतजमीनीवर अवैध चुनखडीचे उत्खनन प्रकरणी में मानीकगड सिमेंट कंपनीचे अधिकारी,  विरुद्ध अट्रासिटीचा कलमानुसार गुन्हा दाखल करन्यास गंभीर रिपोर्ट देण्यात आली आहे.

भुपूष्ठभाग भाड्याने, अर्थात ठेक्याने जमीन घेऊन, कुठलीही परवानगी नसताना,अवैधरित्या चुनखडीचे उत्खनन ४५ वर्षापासुन करीत होते. दिनांक ७/२/२०२६ रोजी बुलडोझर लावून घरे उद्ध्वस्त केली होती.

में मानीकगड सिमेंट कंपनीचे अधिकारी, मुकेश गहलोत, नवीन कौशिक, राजेश झाडे, सचिन गोवारदिपे, यांच्या वर अट्रासिटीचा कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची तक्रार  सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे  वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी गंभीर रिपोर्ट दिली आहे. गडचांदूर येथील ठाणेदार यांनी वस्तूनिष्ठ दस्तऐवज सह बयान नोंदविला आहे. अनेक शेतकऱ्यांनी सुद्धा गंभीर तक्रारी केल्याची माहिती  आहे.
 
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे कुंसूबीचे २४ आदीवासीचे प्रकरणं न्यायप्रविष्ट असतानाही, वरिष्ठ महसूलचे अधिकारी यांच्या कुठलाही आदेश नसताना, दिनांक ६/२/२०२६ चा रात्री बुलडोझर लावून २४ घरे उद्ध्वस्त केलीच कशी? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

१९८५ मध्ये  जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी कुंसूबीचा २४आदीवासी यांची ६३.६२ हेक्टर आर अर्थात १५७ एकर शेतजमीन भुपूष्ठभाग भाड्याने, दर पाच वर्षांनी नुतनीकरण करणे या शर्ती व अटी वर में मानीकगड सिमेंट कंपनीला दिला,मात्र कंपनीने  ४५ वर्षापासून नुतनीकरण केले नाही,व अवैध चुनखडीचे उत्खनन केले.
कुंसूबीचे आदीवासी  प्रकरण मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे न्यायप्रविष्ट असतानाही, वरिष्ठ अधिकारी यांच्या कुठलाही आदेश नसताना,कंपनीचे व्यवस्थापक मुकेश गहलोत, नवीन कौशिक, राजेश झाडे, सचिन गोवारदीपे,  भारत आत्राम, व आनंदराव मेश्राम यांनी कटकारस्थान करून, संगणमत करुन, बोगस करार करून, बनावट दस्तऐवज तयार करून ते खरे म्हाणुन वापरने, बुलडोझर लावून आदीवासी यांची घरे उद्ध्वस्त केली व बेकायदेशीर ताबा घेतला त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांवर अट्रासिटीचा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी गंभीर रिपोर्ट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  महाराष्ट्र राज्य तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी व महसूल अधिकारी यांना तक्रार दिली होती.

 गडचांदुर येथील ठाणेदार यांनी आज रितसर बयान नोंदवून घेतले, व संपूर्ण प्रकरण समजावून घेतले.
मौजा कुंसुबीचे अनेक पीडीत आदीवासी बांधव यांनी सुद्धा काल भारत आत्राम व आनंदराव मेश्राम यांच्या विरुद्ध तक्रारी केल्या असून आजही अनेक पीडित आदिवासी बांधवांनी गंभीर रिपोर्ट गडचांदुर पोलिस ठाण्यात दाखल केले आहे.

सर्व तक्रारींची सखोल चौकशी करून योग्य कारवाई गडचांदुर येथील ठाणेदार  करणार असल्याचे तक्रारदार विनोद खोब्रागडे व आदिवासी बांधव  यांनी सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या