Ticker

6/recent/ticker-posts

सिल्ली येथील कमळ पुष्पांनी बहरलेल्या जलाशय आणि वनश्री मुळे इको _टुरिजम विकास करिता प्रयत्न गरजेचे


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-शहरापासून काही अंतरावर असलेल्या सिल्ली या गावात रमणीय तलाव आणि तालाव काठी सामाजिक वनीकरण ने पंचायत  योजने अंतर्गत एक हेक्टर मध्ये या गावाला वनश्री पुरस्कार मिळाल्याने शासन ,सामा.वनीकरण कडून तयार केलेली *पंचायत वनश्री* इथे साकार करून वड  पिंपळ,आंबा, कडुलिंब,उंबर इत्यादींचे 100 झाडे लावण्यात आली परंतु सामाजिक वनीकरण कडून येथे देखभालीसाठी कुणी कर्मचारी नसल्याने येथे गुरे _ढोरे चरत असल्याने झाडांना नुक़सान होत आहे, ज्यामुळे पंचायत वन भविष्यात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशी खंत  गावकर्‍यांनी व्यक्त केली .नुकतेच ग्रीन हेरीटेज चे मोहम्मद सईद शेख यांनी तलाव आणि पंचायत वनर्षी स्थळांस भेटी दरम्यान आपली व्यथा  त्यांनी व्यक्त केली.सिल्ली पासून तर झबाडा पर्यंत रस्त्यावर 2 की.मी. दुतर्फा हिरवीगार करंजी ची झाडे सामाजिक वनीकरण विभागाने सन 2012_13 मध्ये लावली होती तेथून जातांना थंडी वाटते. रस्त्याचा  कडेला बाजूलाच या विभागाने सन 2010  मध्ये नर्सरी विकसित केली होती 
.  रस्त्याने जात असतांना येथील हिरवळी नजरेस पडते. 
*कमळ पुष्पांनी बहरलेला तलाव* _ सिल्ली गावांतील तलाव  पाण्याने तुडुंब भरलेला 90 टक्के जलसाठा आहे.तलाव कमळ पुष्प व नैसर्गिक सौंदर्याने बहरलेला .येथील स्व. 45
 वर्षांपूर्वी त्याकाळी उप सरपंच व सरपंच  यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व.नाशिककरावजी तिरपुडे यांचे कडे  सील्लीचे हे तलाव गावात दर वर्षी दुष्काळ परिस्थिती मुळे शेतकरी व नागरिकांना पाण्याची  सोयी उपलब्ध करून देण्याकरिता आग्रह केला होता,नाला असलेल्या जागी नवीन तलावाचे निर्माण करण्यात आले व दरवर्षी दुष्काळग्रस्त असणारा हा तलाव पाण्याने तुडुंब भरून वाहू लागला आणि संपूर्ण गाँव परिसर पूर्णपणे ओलिताखाली आला.आज या तलावामुळे  जल सिंचनाची सोयी  झाल्यामुळे येथील शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली,गावांतील विहिरी पाण्याने भरून येथे रमणीयता वाढली. 
हे तलाव गावा शेजारी असून बारमाही पाणी राहते तळ्यात कमळाचे फुल पाहायला मिळाले असता पाण्यावर तरंगताना सुंदर व आकर्षक रूपाने ध्यान आकर्षित करत आहेत.तसेच तळ्यात हिवाळा ऋतुमधे ऑस्ट्रेलिया येथून पक्षी येत असल्याची ही माहिती आहे. हा तलाव नैसर्गिकरित्या जिवंत असून जलाशयकाठी सुंदर "पंचायत वन" असल्याने या परिसराला एक सुंदर स्वरुप प्राप्त झाले आहे.इथे बोटिंग,पक्षी निरीक्षण कुटी,बर्ड_ वॉचिंग,मनोरे,खाली जागेत नर्सरी विकसित करून  योग्य ती देखभाल करिता याकडे संबंधित विभागाने लक्ष दिल्यास हा परिसर *इको _टुरिजम* म्हणुन विकसित होवू शकेल असा मानस ग्रीन हेरीटेज पर्यावरण संस्थे तर्फे मो.सईद शेख   यांनी व्यक्त केला आहे .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या