Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांचे खरिपाचे धान खरेदी न झाल्यास १३ एप्रिल पासून तहसील लाखनी समोर बेमुदत उपोषण


•छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजूर संघटना लाखनीचा  इशारा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी(श.प्र.):-भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात खरिपाच्या धान खरेदीचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून, लाखनी तहसील कार्यालयासमोर १३ एप्रिल २०२६ पासून शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजूर संघटना लाखनी च्या वतीने बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.भंडारा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला शासनाने धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून न दिल्याने जिल्ह्यातील सुमारे ७७,६७८ नोंदणीकृत शेतकरी हमीभावापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.त्यामुळे लग्न समारंभ,कर्ज परतफेड, आर्थिक देवाणघेवाण यासारख्या उदभवल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. यापूर्वी वरील विषयाचे अनुसंगाने दि. १एप्रिलला मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य याना तहसिल कार्यालय लाखनी मार्फत निवेदन दिले होते परंतू प्रलंबित असलेले शेतकऱ्याचे खरीप धान खरेदी करण्याबाबद आतापर्यंत कोणतेही आदेश मिळाले नसल्याने सन २०२५-२६ च्या खरीप हंगामाने धान लिमीट (लक्षांक) च्या अभावाने भंडारा जिल्हयातील हजारो शेतकक्रयांचे धान घरात व खरेदीविक्री केंद्रावर पडून आहेत. तसेच अवकाळी पावसाने धान खराब होऊन नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजूर संघटना लाखनी वतीने लक्षांक वाढवून आधारभूत धान खरेदी करण्याचे निवेदन दिले होते.पण धान खरेदीचा तिढा न सुटल्यास आणि प्रशासनाने ८ दिवसात ठोस निर्णय न घेतल्यास, तहसील कार्यालय लाखनी समोर बेमुदत उपोषण तसेच टाळे ठोकण्याचा आणि राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याचा इशाराही शेतकरी संघटनांचे अध्यक्ष मनोज पटले यांनी दिला आहे.खरीप हंगामातील संपूर्ण धानाची खरेदी हमीभावाने व्हावी, ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. खरेदी रखडल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांना खाजगी व्यापाऱ्यांना कमी दरात धान विकण्याची वेळ येत आहे. 'धानाचा कोठार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात लाखनीसह इतर तालुक्यातील हजारो शेतकरी या संकटाचा सामना करत आहेत. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजूर संघटना लाखनीच्या वतीने (१०एप्रिल) रोज शुक्रवारला उपजिल्हाधिकारी भंडारा व लाखनी तहसीलदार सौ.शितल घावटे यांना निवेदन देण्यात आले त्यामुळे १३ एप्रिल १२०२६ ठीक ११.०० वाजेपासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला.निवेदन देतेवेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, मनोज पटले,लाखोरी जिल्हा परिषद सदस्य सौ, सुर्मिला अशोक पटले,पंचायत समिती उपसभापती सुनील बांते लाखनी,  माजी उप सभापती गिरीश बावनकुळे लाखनी, संघटनेचे सचिव सुधाकर हटवार,श्रावण कापगते, धनराज पारधी, सामाजिक कार्यकर्ते  अशोक पटले,नूशीराम रघोर्ते , नामदेव झलके,धनपाल बोपचे इत्यादी उपस्थित होते.
*प्रतिक्रिया*:- सन २०२५-२६ च्या खरीप हंगामाचे शेतकऱ्यांचे धान पणन महासंघ तर्फे लक्षांक वाढवून खरेदी करायला पाहिजे होते पण राज्य सरकार आधीच हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांच्या धान खरेदीसाठी कोणतीच कारवाही करत नसल्याचे दिसत असल्याने १३ एप्रिल पासून तहसील कार्यालय लाखनी समोर बेमुदत उपोषण करण्याचे ठरविल्याने उपोषणात शेतकऱ्याने स्वामील व्हावे.
*मनोज पटले अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजूर संघटना, लाखनी*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या