Ticker

6/recent/ticker-posts

जयसिंह चौक ते मसूद मळा या रस्त्यावरील खड्डे बुजाविण्याच्या कामास सुरुवात

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर:-अकलूज शहराला आदर्श व स्वच्छ शहर बनविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय मा.  विजयसिंह मोहिते पाटील, स.म.श.मो.पा. साखर कारखान्याचे चेअरमन मा.  जयसिंह (बाळदादा) मोहिते पाटील, विधानपरिषद आमदार आदरणीय मा. रणजितसिंह (दादासाहेब) मोहिते पाटील, माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा.  धैर्यशील (भैय्यासाहेब) मोहिते पाटील, अकलूज नगरपरिषद नगराध्यक्षा मा. सौ. रेश्माताई अडगळे तसेच अकलूज नगरपरिषद गटनेते तथा उपनगराध्यक्ष मा. श्री. शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज शहर स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक बनविण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे.
या अनुषंगाने आज जयसिंह चौक ते मसूद मळा या रस्त्यावरील खड्डे बुजाविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. मागील काही दिवसांपासून मा. शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाला गती दिली. तसेच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नगराध्यक्ष मा. सौ. रेश्माताई अडगळे यांनीही मा. शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत संबंधित विभागाला पत्र देऊन पाठपुरावा केला होता.

यावेळी नगरसेवक मा. मिलिंद कोतमिरे व मा. अझरुद्दीन शेख उपस्थित होते. तसेच या दोन्ही नगरसेवकांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली.

अकलूज शहराच्या विकासासाठी अशा विविध कामांद्वारे नागरिकांना अधिक सुरक्षित, सुकर आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू राहणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या