Ticker

6/recent/ticker-posts

तुमसरमध्ये व्हॉइस ऑफ मीडियाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, पत्रकार भवन उभारणीवर भर

पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी वाईस ऑफ मीडिया पुढाकार घेणार - शशिकांत भोयर


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा:- जिल्ह्यातील तुमसर येथे व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकारांची एक महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. शहरातील जुना बस स्टँड परिसरातील पंचशील हॉटेल येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील तसेच शहरातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक राहुल डोंगरे, अनिल कारेमोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत तुमसर शहरात स्वतंत्र पत्रकार भवन उभारणीचा मुद्दा प्रमुखत्वाने चर्चेला आला. पत्रकारांना सुसज्ज व कायमस्वरूपी कार्यस्थळ मिळावे, यासाठी पत्रकार भवनाची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. यामुळे पत्रकारांना कामकाज सुलभ होऊन त्यांच्या व्यावसायिक कार्यक्षमतेत वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
बैठकीदरम्यान पत्रकारांना सध्या भेडसावत असलेल्या विविध समस्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः पत्रकार भवनाच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत उपस्थितांनी आपले अनुभव मांडले.
यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिला अध्यक्ष शशिकांत भोयर यांनी पत्रकारांच्या समस्या गांभीर्याने घेतल्या जातील, असे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, पत्रकार भवनाच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.
बैठकीचा समारोप सकारात्मक वातावरणात झाला असून, पत्रकारांच्या एकजुटीमुळे लवकरच या मागण्यांना यश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच तालुक्यातील व शहरातील सर्व पत्रकारांचा व्हॉइस ऑफ मीडिया मध्ये सहभागी करून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये तालुक्यातील सर्व प्रिंट मी, इलेक्ट्रॉनिक मीडिया तथा सोशल इलेक्ट्रॉनिक मीडिया चे पत्रकारांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांगितले.
 सदर बैठकीला अनिल कारेमोरे, तुषार पशिने, धनंजय बडवाईक, अमृतलाल चरडे, राहुल भुतांगे, राहुल डोंगरे, जीवन वनवे, राकेश श्यामकुवर, लक्ष्मीकांत वर्मा, लोकेश ठवरे प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या