Ticker

6/recent/ticker-posts

ग्राहक पंचायत महाराष्ट्रचा धडाका चार ग्राहकाला मिळाला न्याय

१५ दिवसात ४ ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती  : ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती कडे मागील १५ दिवसात ४ विविध लिखित तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावर कारवाई करत चारही ग्राहकांना न्याय मिळवून दिला.
     प्राप्त माहितीनुसार, रजनी शेंडे यांनी मोबाईल टावर कंपनी विरोधात प्लॉटवर खंदलेले गड्डे भरून देत नसल्याची तक्रार ग्राहक पंचायत महाराष्ट्र कडे केली होती. यावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती ने लगेच कारवाई करत मोबाईल टावर कंपनीला फ़ोन करून लवकरात लवकर खड्डे बुजवून देण्याचे सांगितले. त्यावर मोबाईल टावर कंपनीने तात्काळ कारवाई करत रजनी शेंडे यांच्या प्लॉटवरचे खड्डे जेसीबी द्वारे बुजवून दिले. अनेक दिवसापासून कंपनीच्या कारभारामुळे त्रासलेल्या शेंडे यांनी ग्राहक पंचायतचे आभार मानले.
     रवी भांडारकर यांची फ्रीज मागील तीन महिन्यांपासून नादुरुस्त होती. कंपनीकडून कॉम्प्रेसर बदलून दिले होते. परंतु पुन्हा खराब झाल्याने ग्राहकाने कंपनी आणि दुकानदारासोबत अनेकदा संपर्क केला पण लवकर समाधान न झाल्याने ग्राहक रवी भांडारकर यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र कडे लिखित तक्रार दिली. त्यावर तत्काळ कारवाई करत ग्राहक पंचायत ने फ़ोन द्वारे दुकानदाराला संपर्क करून नादुरुस्त फ्रीज लवकर दुरुस्त करून देण्याचे सांगितले. दुकानदाराने सहकार्य करत कंपनीच्या टेक्निशन ला दुसऱ्याच दिवशी बोलावून नादुरुस्त फ्रीज दुरुस्त करून दिला.
     नामदेव रामटेके यांनी दुकानातून कमोड शीट विकत घेतली होती. परंतु ती शीट बाथरूम मधे लावण्यास अडचण निर्माण होत असल्याने ग्राहकाने ती शीट दुकानदाराला परत घेण्यास विनंती केली. परंतु दुकानदाराने जास्त दिवस झाल्याने परत होणार नाही आहे सांगितले. त्यामुळे ग्राहकाने ग्राहक पंचायत महाराष्ट्रकडे तक्रार केली. तक्रारीची दाखल घेत ग्राहक पंचायत महाराष्ट्र ने दुकानदारासोबत संपर्क करून ग्राहक संरक्षण कायदा २०१९ बद्दल माहिती दिली आणि काय कारवाई होऊ शकते याबद्दल समजावून सांगितले. त्यानंतर दुकानदाराने लगेच त्याच दिवशी ग्राहकाची कमोड शीट परत घेतली आणि ग्राहकला त्याचे पैसे परत मिळाले.
     सोमेश्वर उपरे यांनी चंद्रपूर येथील एका शिक्षण संस्थेत मुलाचा १० हजार एडवांस देवून प्रवेश घेतला. संस्थांच्या प्रतिनिधीने सांगितल्या प्रमाणे संस्थेत तसे दिसून आले नाही. त्यामुळे ग्राहकाने एडमिशन रद्द करून पैसे परत करावे अशी संस्थेच्या संचालकाला विनंती केली. परंतु पैसे परत होणार नाही असे स्पष्ट ग्रहाला सांगण्यात आले. त्यामुळे ग्राहकाने त्रासून ग्राहक पंचायत महाराष्ट्र कडे धाव घेतली. ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे अध्यक्ष, प्रवीण चिमुरकर यांनी संस्थेच्या संचालकाला फ़ोन द्वारे संपर्क साधून ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नुसार संस्थाचालकावर कारवाई होऊ शकते याची सविस्तर माहिती दिली. यावर संचालकाने २ दिवसानंतर ग्राहकाचे पुणे पैसे परत करतो असे आश्वासन दिले आणि दोन दिवसांनंतर ग्राहकाचे पूर्ण पैसे परत मिळाले. 
     रजनी शेंडे, रवी भांडारकर, नामदेव उमाटे आणि सोमेश्वर उपरे या चारही ग्राहकाने ग्राहक पंचायत महाराष्ट्र , भद्रावतीची चमू प्रविण चिमूरकर, डॉ. ज्ञानेश हटवार, वतन लोने, भारत खोब्रागडे, सौ. करून मोघे, सोनल वावरे, विनोद ठमके, गुरुदेव बावणे आणि प्रतिक्षा बनकर यांचे न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे.
======================

ग्राहकाने कोणत्याही कंपनी अथवा दुकानदाराविषयी तक्रार करायला घाबरू नये. न्यायासाठी ग्राहकाने आवाज उठवला च पाहिजे. जर एखादा विक्रेता ३० दिवसांच्या आत सदोष वस्तू परत घेत नसेल, खराब सेवा सुधारत नसेल किंवा तुमचे पैसे परत करत नसेल, तर ती एक अनुचित व्यापारी प्रथा मानली जाते. फक्त वस्तू विकत घेतांना दुकानदारांकडून पक्के बिल, वारंटी कार्ड नक्की घ्यावे. फसवणूक झाली असे वाटल्यास ग्राहक पंचायत महाराष्ट्र सोबत संपर्क करावा. ग्राहक पंचायत महाराष्ट्र नेहमी प्रामाणिक ग्राहकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.

प्रवीण चिमूरकर
अध्यक्ष, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती, जिल्हा चंद्रपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या