Ticker

6/recent/ticker-posts

डायरेक्टरचा बोलबाला,खानेवाले के मुंह मे पडेगा छाला..!

वाढवणा,हंडरगुळीत गुटखा विक्री जोमात.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-आजमितीला गुटखा बंदी फक्त कागदावर आणि गुटखा मिळतो टपरी,हाॅटेल व किराणा दुकाणावर!असे चिञ शाळा,काॅलेज,बाजार एरियात दिसते.
फरक इतकाच की,अशा ठिकाणी गुटख्याच्या माळा दर्शनी भागात न लटकावता पेपरात गुंडाळून हवा तेवढा दिला जातो.
गेल्या कांही दिवसापासुन वाढवणा पोलिसांनी हाळी व वाढवणा भागात गुटखा विक्री व वाहतूक करणा-या वाहनांसह लाखो रुपयांच्या मुद्देमाल जप्त करुन कांही आरोपींना जेलची हवा खाऊ घातली.तरीही हाळी हंडरगुळी व वाढवणा गाव, वाढवणा पाटी परिसरात बाबा रत्ना३००,रजनिगंधा, विमल सह आता या भागात डायरेक्टर नावाचा गुटखा सर्रासपणे विकला जातोय. तेंव्हा आणि हंडरगुळीतील व येथून जवळच असलेल्या पण चाकुर ठाण्याच्या हद्दी मधील एका तांड्यामधील एक दुकाणदार मिस्ड काॅल करताच डायरेक्टर सह हवा तो गुटखा आणुन देतो.अशी माहिती येथील व वाढवणा पाटीवरील १ टपरीवाल्याने दिली.तसेच तेंव्हा डायरेक्टर नावाचा गुटखा येथे येतोच कसा?कोठून?याचा छडा लावणार कोण?
दरम्यान डायरेक्टरची विक्री पाहता असे रे कसे गुटखा बंदी,तुझे प्रशासनाने केले हसे.असे म्हटले तर चुकीचे होणार नाही.
गत कांही दिवसापुवी हाळी व वाढवणा भागात वाढवना पोलिसांनी छापेमारी करत वाहनांसह लाखोंचा गुटखा जप्त करुन आरोपींना जेल मध्ये पाठविले.तरीही याची विक्री थंडावण्याऐवजी येथे डायरेक्टर हा नवीन गुटखा सर्रास विकला जात आहे. हे बघून डायरेक्टर या नावाचा नवीन गुटखा येतो कोठून?तसेच छापे पडत असलेतरी ही या छाप्याचा काडीचाही परिणाम डायरेक्टर विकणा-यांवर होत नसल्यानेच डायरेक्टर रुबाबात विकला जात आहे  देवणी जवळ असलेल्या माञ कर्नाटक राज्यात येणा-या मानकेश्वर येथून चाकुर तालुक्यातील नागदर वाडी-हटकरवाडी तांडातील एक दुकाणदार चाकुर तालुक्यातील अजनसोंडा, नागदरवाडी,येनगेवाडी,
शिरनाळ-बोथी तांडा,झरी,
मष्णेरवाडी आदी गावच्या किरकोळ विक्रेत्यांना देतो. अशी माहिती नागदवाडीचा एक दुकाणदाराने दिली.तर हंडरगुळी येथील विक्रेते अढळवाडी,वडगाव,डाऊळ वाढवणा पाटी,वायगावपाटी सुकणी,मोरतळवाडी,किनी आदी गावच्या किरकोळ विक्रेत्यांना गुटखा सप्लाय करतात.अशी माहिती हळी व वाढवणा पाटीवरील एका टपरीचालकाने दिली आहे.
राज्यात १२ साली गुटखा बंदी करण्यात आली.तसेच गत कांही दिवसात वाढोना पोलिसांनी तस्करांसह लाखोंचा मुद्येमाल ताब्यात घेतला.माञ.तरीही याच्या विक्रीवर तीळभरही फरक पडला नसल्याने आणि या बंदीचे अन्न सुरक्षाविभागाने हसे केल्याचे बोलले जाते.
कारण,पोलिस किती जरी अलर्ट दिसत असलेतरी ही अन्नसुरक्षा अधिकारी या धंद्यावर कधी छापा मारला असे ऐकण्यात नाही.म्हणुन डायरेक्टर गुटख्याचा हाळी भागात बोलबाला आणि तो खाणा-यांच्या तोंडात पडतो छाला.
येथील एका दुकाणातुन ठोक मध्ये रद्दी पेपरात पॅक करुन बाबारत्ना,रजनिगंधा, डायरेक्टर,विमल सर्रासपणे विकला जातोय.

हटकरवाडी,नागदरवाडी इ.
भागात गुटखा तस्करांबद्दल ऐकूण आहे.आणि येत्या कांही दिवसात तस्करांसह किरकोळ विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या जातील
बालाजी भंडे
प्रभारी अधिकारी पो.स्टे.
चाकुर ता.चाकुर

गत कांही दिवसात लाखो रुपयांच्या मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेतले असून लवकरच हंडरगुळी हाळीतील विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल
सुनील गायकवाड,प्रभारी पोलिस अधिकारी,वाढवणा ता.उदगीर 

कर्नाटक राज्यातील अनेक बस गाड्या या मार्गे धावत असून यापैकी कांही बस मध्ये कमलनगरहून चालका शेजारी एका विशिष्ट रंगाचे पोते,बाॅक्स यामध्ये गुटखा येतो.तसेच येथून आंध्रात चिंचा,आंबे वगैर विक्रीसाठी घेऊन जाणा-या टेंम्पोपैकी कांही टेंम्पोमधून गुटखा येतो.अशी चर्चा हंडरगुळी येथील महादेव मंदीर तसेच दाखला आॅफिस भागात होत असते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या