Ticker

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय बुद्ध भीम गीत गायन स्पर्धेचे " 26 जून 2026 वर्धा येथे आयोजन. राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती दिनानिमित्त " कर्तुत्व आणि समर्पणाचा सन्मान सोहळा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 वर्धा : अश्व घोष  सांस्कृतिक मंच वर्धा छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त " राज्यस्तरीय बुद्ध भीम गीत स्पर्धा, वर्ष 4 थे, शुक्रवार दिनांक 26 जून 2026 सकाळी 9 वाजता स्थळ : सत्यनारायण बजाज वाचनालय वर्धा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी " राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती दिनानिमित्त " कर्तुत्व आणि समर्पणाचा सन्मान सोहळा, सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या  " राजश्री छत्रपती शाहू महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. नामांकनाची शेवटची तारीख - 17 जून 2026 पर्यंत, तरी जास्तीत जास्त महाराष्ट्रातील गायक कलावंतांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी असे आवाहन या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक धनंजय नाखले सर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या