Ticker

6/recent/ticker-posts

भद्रावती नाभिक समाजातर्फे गुणवंतांचा सन्मान: दहावीत 82% मिळवणाऱ्या कु. प्रीतवी निंबाळकरचा सत्कार


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती:-इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भद्रावती नाभिक समाजातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. कु. प्रीतवी रवींद्र निंबाळकर हिने दहावीच्या परीक्षेत 82.00% गुण प्राप्त करून समाजाचे नाव उज्ज्वल केले. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नाभिक समाज दुकान असोसिएशनच्या वतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.


या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग हणुमंते, महाराष्ट्र नाभिक युवा जिल्हाध्यक्ष सचिन नक्षिणे, माजी अध्यक्ष बंडू व्ही. लांडगे तसेच समाज कार्यकर्ते सतीश मांडवकर व सुबोध नागपुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कु. प्रीतवी हिला पुष्पगुच्छ व संत नगाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन गौरविण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी कु. प्रीतवीचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. "विद्यार्थ्यांची मेहनत, जिद्द आणि पालकांचे मोलाचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले," असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. समाजातील इतर विद्यार्थ्यांनीही कु. प्रीतवीचा आदर्श घेऊन शिक्षणात प्रगती करावी, असे आवाहन आयोजकांनी केले.
--------------------------------------
अभिनंदन! भद्रावतीच्या कु. प्रीतवी रवींद्र निंबाळकर हिने दहावीत 82% गुण मिळवले. नाभिक समाज दुकान असोसिएशनतर्फे पुष्पगुच्छ व नगाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार. समाजातील गुणवंतांचा सन्मान. पुढील वाटचालीस शुभेच्छा!
--------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या