चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-पवनी तालुक्यातील अड्याळ केंद्रांतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसलवाडा येथे 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल तवाडे हे होते.ह्याप्रसंगी
मुख्याध्यापिका मनीषा ढवळे,
अंगणवाडी सेविका माया गजभिये,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा पत्रकार जयेंद्र चव्हाण, समिती सदस्य आशिक रामटेके आदी मान्यवर प्रमुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख मान्यवर यांचे हस्ते बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमांचे पूजन करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल तवाडे यांनी ध्वजारोहण केले.जय जय महाराष्ट्र माझा ह्या राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन आणि आभार मुख्याध्यापिका मनीषा ढवळे यांनी मानले.


0 टिप्पण्या