Ticker

6/recent/ticker-posts

बंदरझिरा दर्ग्याचा बंद झरा पुन्हा वाहू लागला; वनविभाग व नूरी सामाजिक समितीचा प्रशंसनीय पुढाकार


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-तुमसर तहसीलमधील आंबागडच्या हिरव्यागार डोंगररांगांमध्ये सुमारे 300 वर्षे जुना, सामाजिक सलोखा व गंगा-जमुनी तहजीबचे प्रतीक असलेला बाबा सिद्दीक शाह दर्गा येथे हिंदू-मुस्लिम भाविक एकता व सद्भावनेने माथा टेकतात. येथे डोंगराच्या आतील भागातून नैसर्गिक गोड पाण्याचा झरा सतत वाहत असतो. सुमारे 150 वर्षे जुने आंब्याचे झाड मोठ्या दगडासह वादळात झऱ्यावर कोसळल्याने पाण्याचा स्रोत बंद झाला होता. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविक तसेच वन्य प्राण्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
यासाठी वनविभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. संबंधित झाड हलविण्यास परवानगी मिळताच JCBच्या साहाय्याने ते झाड कोणतीही हानी न करता बाजूला करण्यात आले. नूरी सामाजिक संस्था आंबागड समितीचे शकील सिद्दीकी, राशिद पटेल, समीर खान पठाण, रशीद शेख तसेच वनविभागाचे वनरक्षक मंगेश सूर्यवंशी व इतर वन कर्मचाऱ्यांनी या कामात व स्वच्छता उपक्रमात सहकार्य केले. झऱ्याचे मुख उघडताच पाणी पुन्हा वाहू लागले.

या उपक्रमाद्वारे जलसंवर्धन व सामाजिक ऐक्याचे एक आदर्श उदाहरण नूरी सामाजिक समिती व वनविभागाने सादर केले आहे. या कार्यासाठी नाकाडोंगरी येथील वन परीक्षेत्राधिकारी श्री. सचिन रामटेके, ग्रीन हेरिटेजचे सईदभाई शेख, मंजूर अहमद,राशिद पटेल,रशीद शेख, समीरखां पठाण सह कमेटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य,वन कर्मचारी आदींचेही सहकार्य लाभले.

येथील भाविकांसाठी रस्ता, पायऱ्या, सोलर वॉटर, प्रकाश व्यवस्था, स्वच्छतागृह, चौकी,  आसन व्यवस्था, पार्किंग आदी सुविधांची तातडीने उभारणी होणे अत्यावश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या