चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत मुरमाडी/तुप येथे तपासणी समितीने भेट देत ग्रामपंचायतीच्या कामकाजाची सखोल पाहणी केली. पंचायत समिती चांदूर रेल्वे येथील गटविकास अधिकारी मा. श्री. संजय खारकर यांच्या नेतृत्वाखालील चमूमध्ये विस्तार अधिकारी पंचायत श्री. सुरेश चव्हाण, श्री. प्रदीप काळपांडे, श्री. प्रफुल्ल जुमडे, श्री. गजेंद्र पाटील, श्री. अनिकेत पाटील, श्री. रवी कलाने तसेच तालुका व पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.
समितीचे ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. सुषमाताई प्रकाशजी चुटे यांनी गावाच्या विकासकामांची माहिती देत ग्रामपंचायतीच्या दस्तऐवज तपासणीस मंजुरी दिली. त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी श्री. डीरीश बाजीराव भोतमांगे यांनी समितीसमोर सर्व आवश्यक कागदपत्रे व नोंदी सादर केल्या.
तपासणीदरम्यान उपसरपंच श्री. दिगंबर पुंडलिक बावनकुळे, सदस्य श्री. मेघनाथ बाळकृष्ण मेश्राम, श्री. कैलास ओमप्रकाश कठाने, श्री. अमर राजीराम बागडे, सौ. शितल अजय गोदे, सौ. स्वाती रामेश्वर चुटे, सौ. सुरेखा बाळकृष्ण धोटे यांच्यासह आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामरोजगार सेवक यांनी समितीला पूर्ण सहकार्य केले.
समितीने गावातील प्रशासन व्यवस्था, नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा, वृक्षलागवड, आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, वाचनालय, स्मशानभूमी तसेच पाणीपुरवठा योजना व त्यांचे स्त्रोत यांची प्रत्यक्ष पाहणी केली. गावातील कर आकारणी वाढीसाठी दुकान गाळे व इतर व्यावसायिक आस्थापनांच्या आकारणीत वाढ करण्याबाबतही समितीने सूचना दिल्या.
संध्याकाळी ६ वाजल्यापासून रात्री ८.३० वाजेपर्यंत चाललेल्या या सखोल तपासणीनंतर समितीने ग्रामपंचायतीच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच ग्रामपंचायत खराशीचे मुख्यालय आणि अतिरिक्त प्रभार असलेले मुरमाडी/तुप ही दोन्ही गावे अभियानात समाविष्ट झाल्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी श्री. भोतमांगे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थ पवन ब्राह्मणकर व मंथन गिलोरकर यांनीही समितीला मोलाचे सहकार्य केले.


0 टिप्पण्या