Ticker

6/recent/ticker-posts

करंजेकर फार्मसी महाविद्यालयात होतकरू विद्यार्थ्यांची निवड


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचालित, बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी साकोली येथे होतकरू विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ऑप्टिकल हेल्प सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कडून या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात एकूण ५४ विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झालेले होते. यातून ९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सदर कंपनीचे व्यवस्थापक टेरिटरी एच. आर. निलेश शंभरकर, असिस्टंट मॅनेजर ( ऑपरेशन ) बळीराम काटेखाये, पर्यवेक्षक प्रीतम चव्हाण आणि प्रवीण ठाकरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. सदर उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आतिश सहारे यांच्या मार्गदर्शनात तथा ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभाग समन्वयक प्रा. सचिन गजभिये यांच्या सहकार्याने यशस्वी करण्यात आला. या उपक्रमासाठी प्रा. डॉ. चंद्रशेखर चकोले, डिप्लोमा विभाग प्रमुख प्रा. बिंदल मिश्रा, प्रा. गीतांजली गडपायले आणि भाग्यश्री बोरकर यांचे सहकार्य लाभले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्था संस्थापक डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, सचिव डॉ. वृंदाताई करंजेकर तथा समस्त प्राध्यापक वृंद यांना दिलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या