Ticker

6/recent/ticker-posts

भद्रावतीत तलवारबाजाला अटक: दुधाळा तलाव परिसरात दहशत माजवणारा जेरबंद

आरोपी रितीक रामटेकेकडून 5 हजारांची धारदार तलवार जप्त; भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती:शहरातील दुधाळा तलाव, किल्ला वॉर्ड परिसरात लोखंडी तलवार बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक 18 मे 2026 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास दुधाळा तलाव परिसरात आरोपी हा धारदार लोखंडी तलवार बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलिसांना मुखबिरामार्फत मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचांसमक्ष आरोपीस ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रितीक संतोष रामटेके, वय 26 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. आंबेडकर चौक, भद्रावती, जि. चंद्रपूर असे आहे.

आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून अंदाजे 5 हजार रुपये किमतीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. सदर तलवारीला स्टीलची मूठ असून ती निमुळती, टोकदार व धारदार आहे. तलवारीची एकूण लांबी 80 सेंटीमीटर, मुठीची लांबी 14 सेंटीमीटर तर पात्याची लांबी 66 सेंटीमीटर असल्याचे पोलिसांनी सांगितले.


पोलीस स्टेशन भद्रावती येथे कलम 4, 25 भारतीय हत्यार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार गोपाल आतकुलवार करीत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोउपनि गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, गोपाल अटकुलवार, अनूप आसुटकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चौधरी, योगेश घाटोळे, खुशाल कावळे व संतोष राठोड यांनी केली.

-----------------------------------------
भद्रावती हादरली! दुधाळा तलाव परिसरात 80 सेंटीमीटरची धारदार तलवार घेऊन दहशत माजवणारा रितीक रामटेके जेरबंद. 5 हजारांची तलवार जप्त. पोलिसांची तत्काळ कारवाई. आंबेडकर चौकातील 26 वर्षीय आरोपीवर हत्यार कायद्यान्वये गुन्हा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या